कोरोना काळात आशा भगिनींनी दिलेलं योगदान अभिमानास्पद, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांकडून कौतुकाची थाप

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 18, 2021 | 9:59 PM

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आशा भगिंनींचे कौतुक केले. जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मालेगाव येथे आशा वर्कर्ससाठी आयोजीत केलेल्या संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी खा. डॉ. सुभाष भामरे, डॉ. अशोक उईके, लक्ष्मण सावजी, मालेगाव जिल्हा अध्यक्ष सुरेश निकम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना काळात आशा भगिनींनी दिलेलं योगदान अभिमानास्पद, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांकडून कौतुकाची थाप
डॉ. भारती पवारांकडून आशा भगिनींचं कौतुक

मालेगाव : कोरोना काळात ग्रामीण व निमशहरी भागातील बालकांच्या व महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आशा भगिनींनी दिलेले योगदान अभिमानास्पद आहे, अशा शब्दात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आशा भगिंनींचे कौतुक केले. जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मालेगाव येथे आशा वर्कर्ससाठी आयोजीत केलेल्या संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी खा. डॉ. सुभाष भामरे, डॉ. अशोक उईके, लक्ष्मण सावजी, मालेगाव जिल्हा अध्यक्ष सुरेश निकम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (Union Health Minister Dr. Bharti Pawar Praise for the work of Asha Workers)

डॉ. पवार म्हणाल्या की, कोरोनाचे संकट रोखण्यासाठी प्रत्येक गावागावात जनजागृती करणे, वेळोवेळी तपासणी करणे अत्यावश्यक होते. गाव पातळीवर ही जबाबदारी आशा भगिंनींनी मोठ्या जोखमीने सांभाळली. त्यांचे हे योगदान कौतुकास्पद आहे. यावेळी डॉ. पवार यांनी आशा भगिंनींनीशी संवाद साधत प्रत्यक्ष काम करत असताना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. त्यावर त्यांना मार्गदर्शन केले. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत त्याविषयी माहिती दिली. यात्रेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी डॉ. पवार यांनी मालेगाव व सटाणा येथील अजेंग, वडणेर, काकडगाव, नामपूर, आसखेडा, सोमपूर, ताहाराबद, पिंपळनेर या गावांना भेटी देत जनतेशी व भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

आदिवासी समाजाच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबध्द

दोन दिवसांपूर्वी भारती पवार यांनी आपली जनआशीर्वाद यात्रा पालघर जिल्ह्यातून गेली. त्यावेळी पालघरच्या आदिवासी बहुल भागातील आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत केंद्र सरकारच्या विकासाच्या योजना पोहचल्या पाहिजेत. आदिवासी समाजाला मुलभूत सुविधा व आरोग्याच्या सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे. या समाजाचा खऱ्या अर्थाने विकास घडविण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्द असल्याची भूमिका पवार यांनी व्यक्त केली होती.

आदिवासी बांधवांसह लोकनृत्यावर ठेका

डॉ. भारती पवार यांनी लोक नृत्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. पालघरमध्ये भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरु असताना मनोर येथे आदिवासी बांधवांनी केंद्रीय मंत्र्यांच्या स्वागतासाठी लोकनृत्य सादर केलं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी या लोकनृत्यामध्ये सहभाग घेत नृत्यावर ताल धरला. भाजप जन आशीर्वाद यात्रेचे डहाणूमधील महालक्ष्मी मंदिर येथे आगमन झाले, त्यावेळी आदिवासी तराफा नृत्याने स्वागत करण्यात आले. डॉ. भारती पवार, प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी यांनी मंदिराबाहेरच महालक्ष्मीची पूजा केली. दर्शनानंतर जन आशीर्वाद यात्रा तलासरीकडे रवाना झाली.

इतर बातम्या :

नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ वगळला! कशी असेल राणेंच्या यात्रेची वाटचाल?

‘बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु’, पडळकरांचा इशारा

Union Health Minister Dr. Bharti Pawar Praise for the work of Asha Workers

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI