AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गट मिंधा की खंदा यांचा निर्णय जनताच घेईल; उद्धव ठाकरेंनंतर आता ‘या’ नेत्याचाही शिंदे गटावर घणाघात

सध्या दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडून शिवसेना आणि शिंदे गट दोघांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे. आता यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येतआहेत.

शिंदे गट मिंधा की खंदा यांचा निर्णय जनताच घेईल; उद्धव ठाकरेंनंतर आता 'या' नेत्याचाही शिंदे गटावर घणाघात
एकनाथ शिंदेंचे डुप्लीकेट विजय मानेंची हायकोर्टात धावImage Credit source: social media
| Updated on: Sep 22, 2022 | 2:21 PM
Share

मुंबई :  सध्या दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडून शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गट दोघांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे. आता याविरोधात शिवसेनेकडून न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. यावर शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होईल, त्यासाठी न्यायालय आम्हाला परवानगी देईल असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी यावेळी मनसे आणि शिंदे गटावर देखील निशाणा साधला.

नेमकं काय म्हणाले परब?

अनिल परब यांनी यावेळी बोलताना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे गट मिंधे की खंदे हे जनताच ठरवेल असं त्यांनी म्हटलं आहे. बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा जोरदार समाचार घेतला होता. आता त्यानंतर अनिल परब यांनी देखील शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

अनिल परब यांनी केवळ शिंदे गटावरच नव्हे तर मनसेवर देखील निशाणा साधला आहे. मनसेला फक्त इशाराच देता येतो असा टोला परब यांनी लगावला आहे.

‘शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा’

अनिल परब यांनी दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा होईल. आम्ही याबाबत न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. न्यायालय आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देईल, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला आहे.

तसेच काल उद्धव ठाकरेंच्या सभेला झालेली गर्दी पाहून खरी शिवसेना कोणाची आहे? आणि शिवसैनिक कोणासोबत आहेत याचा तर अंदाज आलाच असेल असंही परब यांनी म्हटलं आहे.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत