रजनीगंधा खा, डोके शांत ठेवा; आव्हाडांनी दिला अजब सल्ला

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने चर्चेत आले आहेत. डोके शांत ठेवण्यासाठी रजनीगंधा पानसुपारी खाण्याचा सल्ला त्यांनी जनतेला दिला आहे.

रजनीगंधा खा, डोके शांत ठेवा; आव्हाडांनी दिला अजब सल्ला
जितेंद्र आव्हाड

 मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने चर्चेत आले आहेत. डोके शांत ठेवण्यासाठी रजनीगंधा पानसुपारी खाण्याचा सल्ला त्यांनी जनतेला दिला आहे. विशेष म्हणजे राज्यात गुटखा, पानमसाल्यावर बंदी असल्याचा विसर त्यांना पडला आहे. भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना त्यांनी डोके शांत ठेवायचे असेल तर रजनीगंधा पानसुपारी खा , असा वादग्रस्त सल्ला उपस्थितांना दिला आहे. आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तृळात उलट सूलट चर्चा रगल्याचे पहायला मिळत आहे.

काय म्हणाले आव्हाड?

शुक्रवारी भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आव्हाड यांनी म्हटले आहे की, मी मुस्लीम बांधवांना विनंती करतो की, त्यांनी शांत राहावे, डोके गरम करून घेऊ नये. विरोधकांना तुमची डोके भडकवयाची आहेत. त्यामध्ये त्यांचा मोठा राजकीय स्वार्थ आहे. पण तुम्ही शांत रहा. डोके थंड ठेवण्यासाठी मांस कमी खा, तोंडात रजनीगंधा, गुटखा, पानमसाला हवे ते ठेवा, मात्र शांत रहा असे आव्हाड यांनी म्हटले आहे. उद्घाटन कार्यक्रमातील या वादग्रस्त वक्तव्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले असून, राज्यात गुटखा बंदी असताना आव्हाड असे वक्तव्य कसे करू शकतात, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

भाजपावर निशाणा

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी महागाई, पेट्रोल,डिझेल दरवाढ आणि पंतप्रधान मोदींच्या 15 लाखांच्या घोषणेवरूनही त्यांनी भाजपावर निशाणा साधला. आपण हे लक्षात घ्यायला हवे की देशात महागाई उच्चस्थरावर आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. भाजपाची सत्ता आल्यास देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख जमा होतील, अशी घोषणा मोदींनी केली होती. मग आता त्या घोषणेचे काय झाले, असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

संबंधित बातम्या 

धक्कादायक: 2 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून कपाटात कोंडले, नागरिकांच्या हाती लागताच चांगलाच चोपला, औरंगाबादची घटना

Omecron : HIV च्या विषाणुमुळे आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन ? वैज्ञानिकांच्या अंदाजाने मोठी खळबळ

विमानतळावर उतरलेल्यांना सक्तीचे अलगीकरण, ओमिक्रॉन कोरोनाचा रुग्ण आढळल्यास इमारत सील, मुंबई पालिका सज्ज

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI