Sunil Raut : भाजपाला संजय राऊतांची भीती म्हणून ईडीची कारवाई, संजय राऊतांच्या स्टाईलमध्ये सुनील राऊत झाले व्यक्त

संजय राऊत यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा प्रभाव आहे. गेल्या 30 ते 32 वर्षापासून ते पक्षासाठी काम करीत आहेत. जे बाळासाहेबांना अपेक्षित होते तेच संजय राऊत करीत आले आहेत. त्यामुळे संजय राऊत कोणता भ्रष्टाचार हे करुच शकत नाहीत. त्याबद्दल सर्व जनतेने आणि विरोधकांनीही निश्चिंत रहावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दोन अडीच वर्षापासून त्यांनी भाजपाविरोधात घेतलेली भूमिका त्यामुळेच ही कारवाई झाली आहे.

Sunil Raut : भाजपाला संजय राऊतांची भीती म्हणून ईडीची कारवाई, संजय राऊतांच्या स्टाईलमध्ये सुनील राऊत झाले व्यक्त
Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 3:27 PM

मुंबई :  (Sanjay Raut) खा. संजय राऊत हे सध्या (ED Office) ईडीच्या अटकेत असून त्यांना 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. रविवारी मेडिकलसाठी त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, (Sunil Raut) सुनील राऊत यांनी ईडीच्या कारवाईमध्ये काही तथ्य नसून त्यांना गेल्या दोन-अडीच वर्षापासून भाजपाविरोधात भूमिका घेतल्याने हा कारवाई केली जात असल्याचा आरोप केला. एवढेच नाहीतर संजय राऊत हे तंदरुस्त, मजबूत आणि आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी संजय राऊत यांच्या स्टाईलमध्येच सांगितले. शिवाय सोमवारी त्यांची पोलीस कस्टडीही संपत असल्याचे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर ते मार्गक्रमण करीत आहेत. त्यामुळेच त्यांना कारवाईला सामोरे जावे लागत असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

40 बंडखोरांना शिवसैनिकांचा तळतळाट

40 आमदारांनी केवळ शिवसेना पक्षाशीच नाहीतर बाळासाहेब ठाकरे यांच्याशी देखील गद्दारी केली आहे. आणि शिवसेना पक्षाला सोडून जाणाऱ्यांची स्थिती काय होते हे सबंध महाराष्ट्राला माहिती आहे. शिवसैनिकांचे अश्रु हे बंडखोरांना लागलेला तळतळाट आहे. अवघ्या महिन्याभरातच ते अस्वस्थ झाल्याने मैत्री देनाचे औचित्य साधून एकत्र येण्याचे आवाहन करीत आहेत. पश्चातापानंतर जर त्यांना यायचेच असेल तर त्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करावा असेही सुनील राऊत यांनी म्हणले आहे.

संजय राऊत बाळासाहेबांचे निष्ठावंत

संजय राऊत यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा प्रभाव आहे. गेल्या 30 ते 32 वर्षापासून ते पक्षासाठी काम करीत आहेत. जे बाळासाहेबांना अपेक्षित होते तेच संजय राऊत करीत आले आहेत. त्यामुळे संजय राऊत कोणता भ्रष्टाचार हे करुच शकत नाहीत. त्याबद्दल सर्व जनतेने आणि विरोधकांनीही निश्चिंत रहावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दोन अडीच वर्षापासून त्यांनी भाजपाविरोधात घेतलेली भूमिका त्यामुळेच ही कारवाई झाली आहे. भाजपाला संजय राऊतांची भीती त्यामुळेच ईडीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे सुनील राऊत यांनी सांगितले आहे.

कारवाईला भीत नाही, कायम शिवसेनेसोबत

ईडी ला पुढे करुन भाजपाला काय साध्य करायचे आहे हे सर्व राज्याला माहित आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांची चौकशी सुरु आहे. काल त्यांच्या पत्नीला चौकशीला बोलावण्यात आले होते. उद्या मला देखील बोलावले जाईल. पण राऊत कुटुंब हे शिवसेना कधीही सोडणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या रुपात पाहत असल्याचेही सुनील राऊत यांनी ठणकावून सांगितले.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.