‘ईडी’कडून काँग्रेसच्या आणखी एका मोठ्या नेत्याला अटक

कोट्यवधी रुपयांचे हवाला व्यवहार आणि कर चुकवणे याप्रकरणी आयकर विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारावर ईडीने पैशांची अफरातफर केल्याचा आरोप करत शिवकुमार (DK Shivakumar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

'ईडी'कडून काँग्रेसच्या आणखी एका मोठ्या नेत्याला अटक
Follow us
| Updated on: Sep 03, 2019 | 9:01 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे कर्नाटकातील दिग्गज नेते डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पैशांची अफरातफर प्रकरणी गेल्या चार दिवसांपासून त्यांची चौकशी सुरु होती. अखेर चौथ्या दिवशी ईडीने त्यांना अटक केली. कोट्यवधी रुपयांचे हवाला व्यवहार आणि कर चुकवणे याप्रकरणी आयकर विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारावर ईडीने पैशांची अफरातफर केल्याचा आरोप करत शिवकुमार (DK Shivakumar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

शिवकुमार यांनी पीएमएलए (Prevention of Money Laundering Act ) कायद्यांतर्गत शुक्रवारी चार तास आणि शनिवारी आठ तास चौकशी करण्यात आली होती. विशेष म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशीही चौकशीला बोलावण्याने शिवकुमार यांनी नाराजी व्यक्त केली होती. आपण कायद्याचा आदर करत असून चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचं शिवकुमार म्हणाले होते.

ईडीने समन्स दिल्याच्या विरोधात शिवकुमार यांनी कर्नाटक हायकोर्टातही धाव घेतली. पण कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर त्यांना चौकशीसाठी हजर व्हावं लागलं. आपण कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, असं शिवकुमार यांनी अनेकदा सांगितलं आहे.

काँग्रेसचे संकटमोचक

डीके शिवकुमार हे काँग्रेसमधील कर्नाटकचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. 2017 मध्ये जेव्हा गुजरातच्या राज्यसभेसाठी निवडणूक होणार होती, तेव्हा काँग्रेसला आमदार फुटीचं ग्रहण लागलं होतं. त्यावेळी गुजरातमधील काँग्रेसच्या सर्व आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी डीके शिवकुमार यांनी घेतली आणि त्यांना कर्नाटकातील एका रिसॉर्टमध्ये आणून ठेवलं. यावेळी डीके शिवकुमार यांच्यावर आयकर विभागाचे छापेही पडले होते. पण त्यांनी सर्व संकटांना सामोरं जात ही जागा काँग्रेसला जिंकून दिली.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेस-जेडीएसचं सरकार वाचवण्यासाठी डीके शिवकुमार यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मुंबईला बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी आल्यानंतर शिवकुमार यांना अटक करण्यात आली. तरीही त्यांनी आमदारांना भेटण्याचा हट्ट सोडला नाही. पण सरकार वाचवण्यात त्यांना यश आलं नाही.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.