Sanjay Raut : तरीही शिवसेना सोडणार नाही, मरेन पण शरण जाणार नाही; ईडीची धाड पडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

तसेच त्यांनी तिसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी खोटी कारवाई..खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही..मरेन पण शरण जाणार नाही, जय महाराष्ट्र असं ट्विट केलं आहे.

Sanjay Raut : तरीही शिवसेना सोडणार नाही, मरेन पण शरण जाणार नाही; ईडीची धाड पडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
तरीही शिवसेना सोडणार नाही, मरेन पण शरण जाणार नाही; ईडीची धाड पडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रियाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 9:47 AM

मुंबई – संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी सकाळी ईडीची टीम (ED Team) चौकशीसाठी दाखल झाली आहे. त्या टीमध्ये दहा अधिकारी असल्याची माहिती संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी दिली आहे. ईडीचं पथक दाखल झाल्यानंतर तरीही शिवसेना (Shivsena) सोडणार नाही, ईडीची धाड पडताच संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी तिसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी खोटी कारवाई..खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही..मरेन पण शरण जाणार नाही, जय महाराष्ट्र असं ट्विट केलं आहे.

कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही

कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन असं त्यांनी नुकतंच ट्विट केलं आहे. संजय राऊत यांच्या घरी सकाळी ईडीचे अधिकारी दाखल झाल्यानंतर त्यांनी ट्विट करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवरती मागच्या अनेक महिन्यांपासून कारवाई सुरु आहे. अनेकजण ईडीला घाबरुन दुसऱ्या पक्षात गेले आहेत. परंतु मी त्यांना घाबरणार मी माझी लढाई माझ्या पद्धतीने लढत राहीन.

केंद्रीय यंत्रणेकडून चुकीच्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे

खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र असं त्यानी एक ट्विट केलं आहे. ज्यावेळी संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात बोलावलं होतं. त्यावेळी सुद्धा त्यांनी मला केंद्रीय यंत्रणेकडून चुकीच्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे. मी कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही मी माझी लढाई लढेन असंही त्यांनी सांगितले आहे.

गोरेगाव पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी एकदा ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होत. पण त्यांनी त्यांच्या वकीलामार्फत वेळ अधिकची वाढवून मागितली होती.  पण ईडीने ती त्यांना नाकारली होती.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.