AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आगे आगे देखो होता है क्या’, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा; चोराच्या उलट्या बोंबा सुरु असल्याचाही आरोप

श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडी कारवाईनंतर आता शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ईडीच्या या कारवाईनंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'आगे आगे देखो होता है क्या' असं म्हणत थेट इशारा दिलाय.

'आगे आगे देखो होता है क्या', नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा; चोराच्या उलट्या बोंबा सुरु असल्याचाही आरोप
श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडी कारवाईनंतर नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना इशाराImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: Mar 22, 2022 | 9:11 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने जोरदार दणका दिलाय. पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. त्याची आजची किंमत 6 कोटी 45 लाख असल्याची माहिती ईडीने दिलीय. ईडीने पुष्पक ग्रुपच्या (Pushpak Group) कंपन्यांपैकी एक असलेल्या मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित 6 कोटी 45 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलीय. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 सदनिकांचा समावेश आहे, असं ईडीकडून सांगण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ईडीच्या या कारवाईनंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘आगे आगे देखो होता है क्या’ असं म्हणत थेट इशारा दिलाय.

‘आगे आगे देखिए होता है क्‍या! महाराष्‍ट्रात भ्रष्‍टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्‍हणतात चोराच्‍या उलट्या बोंबा. सव्वा दोन वर्षांत महाराष्‍ट्राच्‍या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्‍यांच्‍या नशिबी आत्‍महत्‍या! आप्‍तांच्‍या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्‍ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्‍या वाट्याला यातील काहीही नाही. सत्‍ता फक्‍त आपण आणि आपल्‍या नातेवाईकांसाठीच!’ असं ट्वीट करत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा देत जोरदार टीकाही केलीय.

नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

‘थेट मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर ही कारवाई झाली आहे. आता मुख्यमंत्री कशासाठी थांबलेत, त्यांनी राजीनामा द्यावा. आतापर्यंत आम्ही सगळीकडे त्यांचं नाव ऐकत होतो. ते आता सिद्ध झालं आहे. तो पैसा काही त्यांच्या घरापर्यंत मर्यादित राहिलेला नाही. ते भुयारी गटार थेट मातोश्रीपर्यंत जातं. त्यामुळे आता मातोश्रीने उत्तर द्यायला हवं, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला उत्तर द्यावं. सचिन वाझे आणि हे पैसे कुठे कुठे फिरत आहेत हे आता समोर आलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नैतिक दृष्टीकोनातून राजीनामा द्यावा’, अशी आक्रमक मागणी आमदार नितेश राणे यांनी केलीय.

इतर बातम्या : 

‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर देशासमोरील मोठा प्रश्न’, पाटणकरांवरील कारवाईनंतर शरद पवारांचा घणाघात

ED Raid : ‘उद्धव ठाकरेंना रात्री झोप येणार नाही’, मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील ईडी कारवाईनंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना