मी भाजपवर नाराज नाही, माझी नाराजी फडणवीस टीमवर : एकनाथ खडसे

"मी भाजपवर नाराज नाही. माझी नाराजी पक्षातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गटावर (Eknath khadse on devendra fadnavis) आहे," अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

  • मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर
  • Published On - 8:58 AM, 12 Jan 2020
मी भाजपवर नाराज नाही, माझी नाराजी फडणवीस टीमवर : एकनाथ खडसे

अहमदनगर : “मी भाजपवर नाराज नाही. माझी नाराजी पक्षातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गटावर (Eknath khadse on devendra fadnavis) आहे,” अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. एकनाथ खडसे यांनी काल (11 जानेवारी) शनिशिंगणापूर येथे शनीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबासह शनीचा अभिषेक केला. मात्र त्यांचा हा दौरा त्यांनी गुप्त ठेवला. यावेळी काही पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी खडसेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवर टीका केली.

मी भाजपवर नाराज नाही. माझी नाराजी ही पक्षातीलच फडणवीसांच्या टीमवर आहे. मला संपविण्याचा झालेला प्रयत्न पक्षाची प्रतिमा मलीन करणारा आहे. अशी टीका खडसेंनी यावेळी केली. मी योग्य वेळ आल्यावर माझ्या मनातील रोष व्यक्त करणार असेही एकनाथ खडसेंनी यावेळी सांगितले.

भाजप सेना युतीला जनतेने कौल दिला. पण सरकार स्थापन करताना दोन्ही पक्षाकडून चुका झाल्यामुळे सरकार स्थापन करता आले नाही. या सरकारला जनादेश नसून हे सरकार फार काळ टिकणार नाही. असेही खडसे यावेळी म्हणाले.

पाच वर्षापासून माझ्यावर अन्याय झाला तो पक्षाकडून नाही तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्यांकडून झाला असल्याची टीकाही खडसेंनी केली. यावेळी खडसेंसोबत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे उपस्थित (Eknath khadse on devendra fadnavis) होते.