मुक्ताईनगरमधून लढण्यास इच्छुक : एकनाथ खडसे

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून मीच इच्छुक आहे आणि पक्षाकडे मीच उमेदवारीची मागणी करणार आहे असे खुद्द माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनीच सांगितले आहे.

मुक्ताईनगरमधून लढण्यास इच्छुक : एकनाथ खडसे
जळगाव : “मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्यावतीने सध्या रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या नावाची चर्चा असली तरी या मतदारसंघातून मीच इच्छुक आहे आणि पक्षाकडे मीच उमेदवारीची मागणी करणार आहे असे खुद्द माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनीच सांगितले आहे.” माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा मतदार संघ असलेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून (muktainagar constituency) या वेळी खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे – खेवलकर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. त्यावर खडसे यांना विचारले असता ते म्हणाले की, “पक्ष जो निर्णय घेईल, तो घेईल, मात्र या मतदार संघातून मीच इच्छुक आहे.”
गेल्या काही दिवसांपासून भाजपात इतर पक्षातील नेत्यांचे इनकमिंग वाढले आहे. याबाबत जळगावात झालेल्या भाजप शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत बोलताना खडसेंनी नेत्यांच्या निष्ठेबाबत वक्तव्य केलं. भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या सध्या मोठी आहे पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासल्यास निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही. तसेच पक्षात येण्यापूर्वी नेत्यांची निष्ठा तपासा असे ते म्हणाले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील पक्षात येणाऱ्यांच्या निष्ठेबाबत वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याशी मी सहमत असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासल्यास पक्षातील निष्ठावंतांवर अन्यायही होणार नाही. तसेच पक्षात येणाऱ्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आम्ही केले आहेत. त्यामुळे त्यांनाच पक्षात घेणं हे चुकीचं आहे. असे ते यावेळी म्हणाले.
अंजली दमानिया यांनी खडसेंविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी आणि याचिका दाखल केल्यानंतर खडसे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे खडसे यांना एका प्रकारे राजकीय वनवास भोगावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर,अब्रुनुकसानीच्या या खटल्यांविरोधात दमानिया यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेत त्यांनी 9 कोटी 50 लाख रुपयांचा डीडी आणि 10 लाखाचा बनावट चेक कोर्टसमोर सादर करत हे खडसे यांचे आहेत अस कोर्टाला सांगत हे सर्व कागदपत्रे खरी आहेत असे अंजली दमानिया आणि मालपुरे यांनी लिहून दिले.
यावर जळगाव पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली असता, त्यांनी याची चौकशी करत अशा कुठल्याही बँकेत खडसे यांचे खाते नाही ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचा अहवाल दाखल केला आहे. त्यावर महाराष्ट्र शासन आणि मी सुप्रीम कोर्टाकडे चौकशीची मागणी केली. त्यात तथ्य आढळून आल्यावर सुप्रीम कोर्टाने अंजली दमानिया मालपुरे आणि अन्य यांना नोटिसा बजावल्या आहेत अशी माहिती खडसे यांनी दिली आहे.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *