"एकनाथ खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाचा विचार करायला हरकत नाही"

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना शिवसेनेने पुन्हा एकदा पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. (Shiv Sena Offers to Eknath Khadse)

"एकनाथ खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाचा विचार करायला हरकत नाही"

रत्नागिरी : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना शिवसेनेने पुन्हा एकदा खुली ऑफर दिली आहे. “खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही”, असं शिवसेना प्रवक्ते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. ते रत्नागिरीत बोलत होते. (Shiv Sena Offers to Eknath Khadse)

“देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खडसेंचं जाहीर युद्ध सुरु आहे. खडसे जर वेगळा विचार करणार असतील, तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही”, असं उदय सामंत यांनी म्हणाले.

खडसे यांच्या स्फोटक वक्तव्यानंतर  भाजपमध्ये सुरु झालेलं युद्ध आता शीत युद्ध राहिलेलं नाही, तर हे खुलं युद्ध सुरु झालं आहे. भाजपमधील ज्येष्ठ असलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर ही वेळ येत असेल तर ते दुदैवी आहे. त्यामुळे खडसेसाहेब भविष्यात काही विचार करणार असतील तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही, असं सामंत म्हणाले.

ज्यांच्यामुळे भाजपची राज्यात सत्ता आली, त्या खडसेंवर ही वेळ येणं हे दुदैवी आहे. पण खडसेंनी ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ असल्याचा उपरोधिक टोलाही उदय सामंत यांनी फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. भाजपमध्ये खदखद आम्ही निर्माण करत नाही, तर याच खदखदीमुळे भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा सामंत यांनी केला.

अयोध्या बंदीबाबत मुख्यमंत्री भूमिका मांडतील

संत महंतांनी मुख्यमंत्र्यांना अयोद्धेत येण्यास बंदी घातली आहे. या प्रकरणी लकवकर मुख्यमंत्री याबाबत भूमिका जाहीर करतील, असं सामंत यांनी नमूद केलं.

चिराग पासवान यांना उत्तर
लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवर उदय सामंतांनी चोख उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम चालू आहे, त्यामुळे पुढील पाच वर्ष काही काम नसल्याने विरोधकांना दुसरा मुद्दा नाही, असं सामंत म्हणाले.

निवृत्त नेव्ही ऑफिसरला मारहाणप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच अटक करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार व्यवस्थित चालू आहे, असा दावा सामंतांनी केला.

(Shiv Sena Offers to Eknath Khadse)

संबंधित बातम्या  

Eknath Khadse | देवेंद्र फडणवीसांनी माझे तिकीटही कापलं, एकनाथ खडसेंचे गंभीर आरोप   

मला एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस : एकनाथ खडसे 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *