नाराज खडसेंनी वात पेटवली, गौप्यस्फोटांची मालिका, 25 खळबळजनक गोष्टी उलगडणार

दिवाळीच्या तोंडावर खडसे (Eknath Khadse) यांनी जळगावातील मुक्ताई बंगल्यावर पत्रकारांशी मुक्त चर्चा केली. यामध्ये नाराज खडसेंनी अनेक गौप्यस्फोट केले.

नाराज खडसेंनी वात पेटवली, गौप्यस्फोटांची मालिका, 25 खळबळजनक गोष्टी उलगडणार
Follow us
| Updated on: Oct 28, 2019 | 7:00 PM

जळगाव :  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर गौप्यस्फोटांची माळ सोडली आहे. दिवाळीच्या तोंडावर खडसे (Eknath Khadse) यांनी जळगावातील मुक्ताई बंगल्यावर पत्रकारांशी मुक्त चर्चा केली. यामध्ये नाराज खडसेंनी अनेक गौप्यस्फोट केले. आधी मंत्रिमंडळातून हकालपट्टी, त्यानंतर तिकीटही कापलं, शिवाय मुलीचाही विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने, एकनाथ खडसे दुखावले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खडसेंनी पक्षाला थेट इशारा दिला आहे.

म्हातारा झालो समजून पक्षाला सोडून नातवंडांसोबत घरी बसू, असा इशारा खडसेंनी दिला. मंत्रिमंडळात पुन्हा घेऊ असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता, मात्र सांगायच्या गोष्टी वेगळ्या आणि करायच्या गोष्टी वेगळ्या असतात, असं म्हणत खडसेंनी मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला चढवला.

याशिवाय भाजपला आपल्या अनुभवापेक्षा विखे-पाटलांसारखे विरोधी पक्षातले अनुभवी लोक पक्षांमध्ये असल्याने त्यांचे अनुभव पक्षाला महत्त्वाचे वाटत आहेत, असा खरपूस समाचार देखील खडसे यांनी यावेळी घेतला.

शिवाय देवेंद्र फडणवीस यांनी ठरवल्याप्रमाणे ते स्वत:च मुख्यमंत्री होणार, असंही भाकीत खडसेंनी वर्तवलं.

एकनाथ खडसे यांनी केलेले गौप्यस्फोट

1 ) शिवसेना नेते सुरेश जैन यांना मुख्यमंत्री बनवा हे सांगण्यासाठी आपण बाळासाहेब ठाकरेंकडे गेलो होतो. मात्र बाळासाहेबांनी सुरेश जैन हे व्यापारी असल्यामुळे त्यांच्या हातात सत्ता देण्यास नकार दिला होता. त्यावेळेस बाळासाहेबांची उंची आपल्याला कळली असे खडसे म्हणाले.

2 ) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलताना खडसे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, तेच ठरलेलं आहे आणि तेच होणार आहे. मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीस होणार आहेत.

3 ) आपण सरकारविरोधी वक्तव्य कधीच केलं नाही. मात्र आपली स्टेटमेंट हे अर्धे तोडून मोडून दाखवली गेली, असा आरोप खडसेंनी मीडियावर केला.

4 ) आपल्याला पक्षाकडून न्याय अपेक्षित आहे. आपल्याबद्दल पक्षाची भूमिका हे विचारांच्या पलिकडे आहे. पक्षाला याबद्दल विचारणार आहोत आणि वाटलं तर म्हातारा झालो आहे म्हणून पक्षाला सोडून आपण घरी नातवंडांसोबत बसू, असा इशारा खडसेंनी दिला.

5) आपल्या अनुभवापेक्षा विखे-पाटलांसारखे विरोधी पक्षातले अनुभवी लोक पक्षांमध्ये असल्याने त्यांचे अनुभव पक्षाला महत्त्वाचे वाटत आहेत, असा खरपूस समाचार खडसे यांनी यावेळी घेतला.

6) मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ असे जाहीर केले होते. मात्र सांगायच्या गोष्टी वेगळ्या असतात आणि आपल्या गोष्टी वेगळ्या असतात, असा टोला खडसेंनी लगावला.

7 ) आता निवांत काळामध्ये आपण पुस्तक लिहिणार आहोत. या आत्मचरित्रामध्ये 25 ते 30 अशा राजकारणातील गोपनीय गोष्टी आपल्याकडे आहेत, त्या कुणालाही माहीत नाहीत, त्यांचा पण उल्लेख करणार आहोत. त्या गोष्टी जगापुढे येतील, असे खडसे यांनी जाहीर केले आहे.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.