Eknath Shinde : शिंदे गट झाला आता शिवसेना बाळासाहेब गट! शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची का भासली गरज? 3 प्रमुख कारणं

Eknath Shinde : 'शिवसेना बाळासाहेब गट' एकनाथ शिंदेंच्या गटाचं नाव ठरलं!

Eknath Shinde : शिंदे गट झाला आता शिवसेना बाळासाहेब गट! शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची का भासली गरज? 3 प्रमुख कारणं
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 1:39 PM

मुंबई : मागच्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याचा आज क्लायमॅक्स समोर आला आहे. कारण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांच्या गटाने आपलं अधिकृत नाव जाहीर केलं आहे. ‘शिवसेना बाळासाहेब गट’ (Shivsena Balasaheb Gat) , असं या गटाचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्ह केलं. यात बाळासाहेबांचं नाव न घेता जगून दाखवावं, असं खुलं आव्हान शिंदे गटाला दिलं आहे. अन् आता शिंदे गटाने आपलं नाव’शिवसेना बाळासाहेब गट’ केल्याचं समोर आलं आहे.

शिंदे गट आता ‘शिवसेना बाळासाहेब गट’

सहा दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या बंडानं महाराष्ट्राचं समाजकारण आणि राजकारण ढवळून निघालं. एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार? उद्धव ठाकरे यांचं पुढचं पाऊल काय असेल? अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या मनात निर्माण झाले. त्यातल्या एका प्रश्नाचं धुसर उत्तर सध्या मिळालंय. एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल पुढे टाकलंय. आपल्या गटाचं नाव ‘शिवसेना बाळासाहेब गट’, असं ठेवलंय.

शिंदे गटाने आपलं नाव ‘शिवसेना बाळासाहेब गट’, असं ठेवण्यामागे तीन प्रमुख कारणं आहेत. ती कारणं काय आहेत पाहुयात…

हे सुद्धा वाचा

1. बाळासाहेब आमचे आम्ही बाळासाहेबांचे

जेव्हापासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड पुकारत आधी सुरत आणि मग गुवाहाटी गाठलं, तेव्हा आपण शिवसेनेतून बाहेर पडतोय, असं एकदाही म्हटलेलं नाही. उलट आम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहोत. त्यांचा हिंदुत्वाचा मुद्दा आम्ही पुढे घेऊन जातोय, असं पुन्हा-पुन्हा अधोरेखित केलं. त्यामुळे त्यांनी आपल्या गटाला बाळासाहेब गट असं नाव देणं तितकंस आश्चर्याचा धक्का देणारं नाही.

2. हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व हा शिवसेनेच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा महत्वाचा भाग आहे. बाळासाहेबांनीही कायम हिंदुत्वाचा मुद्धा हिरीरीने मांडला. त्यासाठी वेळप्रसंगी कठोर आणि ठाम भूमिकाही घेतली. त्यामुळे मागच्या सहा दिवसांपासून शिंदे गट जो हिंदुत्वाचा मुद्दा मांडत आहे. शिवाय बाळासाहेबांचे आम्ही वारसदार असं सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या गटाच्या नावात बाळासाहेबांच्या नावाचा वापर केला आहे.

3. शिवसेना म्हणजे बाळासाहेब, बाळासाहेब म्हणजे शिवसेना!

शिवसेना म्हणजेच बाळासाहेब अशीच ओळख अवघ्या महाराष्ट्राला आहे. बाळासाहेबांशिवाय शिवसेना अपूर्ण आणि शिवसेनेशिवाय बाळासाहेब या व्यक्तीमत्वाचं वलय अपूर्ण… त्यामुळे आम्ही शिवसेनेचाच भाग आहोत, असं म्हणताना बाळासाहेबांशिवाय शिवसेनेचं नाव वापरणं म्हणजे जवळपास अशक्य त्यामुळे शिंदे गटाने ‘शिवसेना बाळासाहेब गट’, असं आपलं नाव निश्चित केलं.

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.