AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आताच्या घडीतील सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांची गाडी बदलली, मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान मोठ्या घडामोडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उत्तर प्रदेश सरकारकडून एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. उद्या एकनाथ शिंदे यांचं अयोध्येत जंगी स्वागत होणार आहे. पण त्याआधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

आताच्या घडीतील सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांची गाडी बदलली, मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान मोठ्या घडामोडी
| Edited By: Chetan Patil | Updated on: Apr 08, 2023 | 8:21 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या पक्षाच्या सर्व आमदार-खासदारांसह अयोध्या (Ayodhya) दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. सर्वजण आज संध्याकाळी पाचच्या सुमारास मुंबई विमानतळाहून लखनौच्या दिशेला रवाना झाले. त्यांच्या स्वागतासाठी लखनौ विमानतळावर योगी सरकारकडून विशेष तयारी करण्यात आलीय. एक विशेष बँड पथक लखनौ विमानतळावर सज्ज करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत. या घडामोडींना आज दुपारपासून सुरुवात झाली आहे. तसेच या घडामोडी उद्या दिवसभर सुरुच राहणार आहेत. या घडामोडी दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांची गाडी बदलण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुलेटप्रुफ कार देण्यात आलीय. एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण आयोध्या दौऱ्यात त्यांच्यासोबत शेकडो पोलीस असणार आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच अयोध्येत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

भाजप नेतेही मुख्यमंत्र्यांसोबत अयोध्येला

या सगळ्या घडामोडी घडत असताना भाजपच्या गोटातही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्यांना देखील अयोध्या दौऱ्याचं निमंत्रण दिलं आहे. त्यांचं हे निमंत्रण राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वीकारलं आहे. त्यामुळे ते सोलापूरहून लखनौच्या दिशेला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे ते सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लखनऊवरून अयोध्येत जाणार आहेत. तसेच राधाकृष्ण विखे पाटील हे श्रीराम मंदिर येथील महाआरतीत देखील मुख्यमंत्र्यांच्या सोबत उद्या सहभागी होणार आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्या दौऱ्याला जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी यूपीचे मंत्री लखनौ विमानतळावर

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी लखनौ विमानतळावर उत्तर प्रदेशचे मंत्री स्वतंत्रदेव सिंह आले. त्यांनी एकनाथ शिंदे लखनौला दाखल होण्याआधी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर गरिब कल्याणाच्या योजना सुरु आहेत, महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था आहे. त्यांचं आज उत्तर प्रदेशात स्वागत होत आहे. ते मुख्यमंत्री बनल्यानंतर पहिल्यांदाच अयोध्येत येत आहेत. ते उद्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी माथा ठेवून लीन होणार आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री स्वतंत्रदेव सिंह यांनी दिली.

“स्वागतासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने मला इथे पाठवण्यात आलं आहे. मी उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो. उद्या एकनाथ शिंदे आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट होईल. त्यांच्या भव्य स्वागताची तयारी करण्यात आली आहे”, असं मंत्री स्वतंत्रदेव सिंह यांनी सांगितलं.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच