AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Politics : गुजरात भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ, एकूण 35 आमदार हॉटेलमध्ये! हॉटेलला पोलीस छावणीचं स्वरुप

Eknath Shinde Breaking News : एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकूण 35 आमदार असल्याच्या दावा करण्यात आला आहे.

Maharashtra Politics : गुजरात भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ, एकूण 35 आमदार हॉटेलमध्ये! हॉटेलला पोलीस छावणीचं स्वरुप
मोठी बातमी
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 21, 2022 | 11:37 AM
Share

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत एकूण 35 आमदार असल्याच्या दावा करण्यात आला आहे.  गुजरातमधील भाजप नेत्यानं याबाबतचा दावा केलाय. याआधीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत 13 आमदार असल्याचं सांगितंल जात होतं. दरम्यान, आता तर तब्बल 35 आमदार असल्याचाही दावा भाजपच्या गुजरातमधील एका नेत्याने केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडालीय. शिवसेनेचे आमदार फुटल्यास महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येण्याची भीती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आलाय.

पाहा व्हिडीओ :

थोडक्यात पण महत्त्वाचं :

  1. फुटलेल्या आमदारांना अहमदाबादला घेऊन जाणार असल्याची माहिती
  2. फुटलेल्या आमदारांची अमित शाहंसोबत गाठभेट घडवून आणणार
  3. एकनाथ शिंदेशी शिवसेनेचा संपर्क झाला
  4. एकनाथ शिंदे चर्चा करण्यास तयार असल्याची माहिती
  5. शिवसेनेचा वरिष्ठ नेते सूरतला जाणार
  6. देवेंद्र फडणवीस पहाटेच दिल्लीला रवाना
  7. शरद पवारही दिल्लीला गेल्याच संजय राऊतांची माहिती

गुजरातमध्ये राजकीय घडामोडी

गुजरामधील ऑपरेशन लोटसची जबाबदारी सीआर पाटील यांच्याकडे सोपण्यात आल्याचंही कळतंय. त्यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. सीआर पाटील हे नवसारीचे खासदार असून त्यांनी महाराष्ट्रातील आमदारांशी संपर्क साधल्याचंही खात्रीलायक वृत्त समोर आलंय. सीआर पाटील यांच्यासोबतच गुजरात राज्याचे गृहमंत्रीही त्यांच्यासोबत आहेत. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंसोबत सर्व आमदारांच्या सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्तही करण्यात आला आहे.

गूजरातचे भाजपचे गृहमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नैतृत्वात ऑपरेशन लोटस राबलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. गुजरातचे भाजपचे गृहमंत्री हर्ष संघवी आणि भाजपचे खासदार तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोघांचा ली मॅरिडीयनमध्ये मुक्काम आहे. हे दोन्ही नेते आमदारांसोबत ठाण मांडून बसलेत.

कोण कोणते आमदार फुटल्याची चर्चा?

1. एकनाथ शिंदे 2. शंभूराज देसाई 3. अब्दुल सत्तार 4. संदीपान भुमरे 5. भरत गोगावले 6. महेंद्र दळवी 7. संजय शिरसाठ 8. विश्वनाथ भोईर 9. बालाजी केणीकर 10. किमा दाबा पाटील 11. तानाजी सावंत 12. महेश शिंदे 13. थोरवे 14. शहाजी पाटील 15. प्रकाश आबिटकर 16. अनिल बाबर 17. किशोर अप्पा पाटील 18. संजय रायमुलकर 19. संजय गायकवाड 20. शांताराम मोरे 21. लता सोनवणे 22. श्रीनिवास वणगा 23. प्रकाश सुर्वे 24. ज्ञानेश्वर चौगुले 25. प्रताप सरनाईक 26. यामिनी जाधव

नाराज एकनाथ शिंदेंच्या यांच्याशी निगडीत ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Follow Us
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता... बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस.
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'-ज्योति वाघमारे
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुजय विखे आक्रमक
'ट्रम्प सारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही'-सुजय विखे
१६ ऑगस्ट २०२६ च्या ठळक बातम्या: महिला आरक्षण, देशातील प्रमुख घडामोडी
१६ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख घडामोडी
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक, प्रवाशांना उशीर
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त