AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: मिलिंद नार्वेकर हॉटेलच्या दारावर ताटकळले, गुजरात पोलीसांनी गाडी अडवली, गोंधळानंतर ग्रीन सिग्नल

एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35हून अधिक आमदार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतो आहे.

Eknath Shinde: मिलिंद नार्वेकर हॉटेलच्या दारावर ताटकळले, गुजरात पोलीसांनी गाडी अडवली, गोंधळानंतर ग्रीन सिग्नल
मिलिंद नार्वेकर हॉटेलच्या दारावर ताटकळलेImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Edited By: sagar joshi | Updated on: Aug 10, 2022 | 3:50 PM
Share

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नाराज नेते एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार शिंदेंच्या बंडामुळे अल्पमतात आल्याचं बोललं जातंय. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी 35 आमदारांसोबत बंड पुकारल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. शिंदे सध्या 35 आमदारांसह सुरतमध्ये आहेत.  शिंदेंची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार रवींद्र फाटक सुरतमध्ये गेले आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा निरोप घेऊन त्यांना भेटण्यासाठी ते सुरतमध्ये आहेत. मात्र, यावेळी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे दोन्ही बडे नेते बराच वेळ ली मेरिडिअन हॉटेलबाहेर ताटकाळत थांबल्याचं दिसून आलं. यावेळी नार्वेकर हे सारखं कुणालातरी फोन करताना दिसून आले. दरम्यान, गुजरात पोलिसांचं संरक्षण असलेल्या शिंदे गटातील कोणतीही व्यक्ती हॉटेलखाली लवकर आल्याचं दिसलं नाही. तर यावेळी पोलिसांनी नार्वेकरांच्या गाडीची दिशा चुकवली. त्यानंतर पुन्हा नार्वेकरांची गाडीस पुढे जाऊन मागे आली. यावेळी गुजरात पोलिसांनी गाडी अडवल्याचंही दिसून आलं.

सूरतमध्ये किती आमदार?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35हून अधिक आमदार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतो आहे. त्यामुळे विधिमंडळ गटनेतेपदावरुन शिंदे यांची हकालपट्टी करता येणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्या बैठकीत हा निर्णय झाला, त्या ठिकाणी शिवसेनेचे बहुसंख्य आमदार उपस्थितच नसल्याचा दावा करण्यात येते आहे. त्यामुळे विधिमंडळ गटनेते पदावरुन शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आता शिवसेना आमदारांचे संख्याबळ कुणाकडे किती आहे, हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत हा वाद चिघळत राहणार असल्याची शक्यता आहे.

राऊतांचा वेगळाच दावा

 आमदारांच्या बैठकीला 33 शिवेसनेचे आमदार उपस्थित होते, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळेच बहुमताने विधिमंडळ गटनेतेपदावरुन उचलबांगडीचा निर्णय घेण्यात आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. काही आमदार हे दिल्लीत असल्याचाही दावा राऊत यांनी केला आहे. गुजरातमध्ये असलेल्या आमदारांच्या जीवाला धोका असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. काही आमदारांनी फोन करुन हत्या होऊ शकते, अशी भीती व्यक्त केल्याचेही राऊत यांचे म्हणणे आहे. तसेच 9 आमदारांच्या कुटुंबीयांनी संपर्क होत नसल्याची तक्रार केल्याचेही राऊत यांनी सांगितले आहे.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...