AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde Vs Shivsena | शिंदे-शिवसेना खटला सोमवारी घटनापीठाकडे जाणार? घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचे 5 महत्त्वाचे मुद्दे!

स्वतंत्र भारताच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची केस आहे. सदर खटला सोमवारी आता घटनापीठाकडे वर्ग केला जाऊ शकतो. तसा निर्णय झाला तर राज्यपालांची भूमिका आणि पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थ काय या दोन गोष्टी ठरवाव्या लागतील, असे उल्हास बापट म्हणाले.

Eknath Shinde Vs Shivsena | शिंदे-शिवसेना खटला सोमवारी घटनापीठाकडे जाणार? घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचे 5 महत्त्वाचे मुद्दे!
उल्हास बापट, घटनातज्ज्ञImage Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Aug 04, 2022 | 1:09 PM
Share

नवी दिल्लीः शिंदे-शिवसेनेचा (Shinde-Shivsena) वाद सोमवारी सुप्रीम कोर्टातून घटनापीठाकडे वर्ग करण्यात येऊ शकतो, अशी शक्यता घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी वर्तवली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे या अत्यंत गुंतागुंतीच्या खटल्याची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आहे. बुधवार आणि गुरुवारी या खटल्यात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. शिवसेनेने आमदारांवर केलेली अपात्रतेची कारवाई का योग्य नाही, यावर एकनाथ शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी आज महत्त्त्वाचे मुद्दे मांडले. शिवसेना पक्षच आमदारांनी सोडला नसल्यामुळे त्यांच्याविरोधात पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. तसेच अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना सदस्यांनी सभागृहातील कामकाजात हजरच राहू नये का आणि असे किती दिवस कामकाजापासून लांब रहावे? असाही प्रश्न हरिश साळवे यांनी उपस्थित केला. तर साळवे यांना प्रत्युत्तर देताना कपिल सिब्बल यांनी तुम्ही शिवसेनेतच आहात म्हणतायत तर मग निवडणूक आयोगाकडे जाण्याचा उद्देश काय, असा सवाल करत शिंदे गटाला कोंडीत पकडलं. या प्रकरणी 8 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होईल, असे सुप्रीम कोर्टाने सांगितलं. घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आजच्या सुनावणीवरून महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

उल्हास बापट काय म्हणाले?

  1. स्वतंत्र भारताच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची केस आहे. सदर खटला सोमवारी आता घटनापीठाकडे वर्ग केला जाऊ शकतो. तसा निर्णय झाला तर राज्यपालांची भूमिका आणि पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थ काय या दोन गोष्टी ठरवाव्या लागतील..
  2. 141 कलमाखाली सर्व न्यायालयांसाठी बंधनकारक असतो. भारतात 28 राज्य आहेत. सर्वच राज्यांत लोकशाही आहे. राज्यपाल आहेत. त्यामुळे संपूर्ण भारताला प्रभावित करणारा हा खटला आहे. त्यामुळे याचं महत्त्व फार मोठं आहे.
  3.  निवडणूक आयोग 324 कलमाखाली घटनेचा भाग आहे. इतर देशांमध्ये अशी स्थिती नाही. फक्त भारतात ही स्थिती आहे. त्याच्या अधिकारात सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे शिवसेना कुणाची ही हा प्रश्न निवडणुक आयोगाकडे जाऊ शकतो. त्यात पुन्हा निर्णय घेण्यात चूक घेतल्याचा आरोप झाल्यास शेवट पुन्हा सुप्रीम कोर्टात होऊ शकतो. कोणत्याही निर्णयानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली जाऊ शकते.
  4. भारतात बऱ्याच लोकांना लिहिता वाचता येत नाही. मतदानाला जातात तेव्हा चिन्हावरच मतदान केलं जातं. त्यामुळे खटल्याचा निकाल लागेपर्यंत चिन्हाचा निर्णय घेऊ नये, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय. कारण शिवसेना कुणाची हे अद्याप ठरलेलं नाहीये. ओरिजनल पक्ष आणि विधिमंडळ वेगळा आहे. सध्याच्या चित्रानुसार मूळ पक्षावर उद्धव ठाकरे आणि विधिमंडळ पक्षावर एकनाथ शिंदेंचं वर्चस्व आहे. त्यामुळे शिवसेना हा मूळ पक्ष उद्धव ठाकरेंकडे राहिल, असं वाटतंय, पण सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय घेईल, हे पाहुयात.

Follow Us
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?