AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kartik Aaryan : शूटिंगदरम्यान कार्तिक आर्यन जखमी, रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं ?

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गुडघ्याला दुखापत झाल्याने महिमच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करावी लागली. राष्ट्रीय पुरस्कार विजेता कार्तिक 'चंदू चॅम्पियन'च्या यशानंतर आता कबीर खानसोबत काम करत आहे. त्याच्या अचानक दुखापतीमुळे चाहते चिंतेत असून तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

Kartik Aaryan : शूटिंगदरम्यान कार्तिक आर्यन जखमी, रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं ?
कार्तिक आर्यनला दुखापत
| Updated on: Aug 19, 2026 | 4:29 PM
Share

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी आली आहे. कारण आगमी चित्रपटासाठी शूटिंग करणाऱ्या कार्तिक आर्यनला दुखपात झाल्याचे उघड झालं आहे. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली असून माहिमच्या फोर्टिस रहेजा हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं, तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं समजतं. 35 वर्षांचा कार्तिक आर्यन सध्या कबीर खान याच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या चित्रपटात काम करत आहे, त्याचदरम्यान त्याला दुखापत झाली. यामुळे त्याचे चिंतेत असून कार्तिकला लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करत आहे. 2024 साली आलेल्या ‘चंदू चँपियन’ या चित्रपटात कार्तिकने कबीर खानसोबत काम केलं होतं, हा चित्रपट प्रेक्षकांना बराच आवडला होता. आता अभिनेता- दिग्दर्शकाची ही जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कारामुळे चर्चेत आला अभिनेता

अलीकडचा काही काळ कार्तिक आर्यनसाठी खूपच खास होता. ‘चंदू चँपियन’ चित्रपटात त्याने पॅरालंपिक गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर यांची भूमिका निभावली होती, आणि याच चित्रपटासाठी त्याला 72 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. मल्याळम सुपरस्टार ममूटीसोबत यांच्यासोबत कार्किने हा पुरस्कार शेअर केला होता. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाल्यानंतर कार्तिकने सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला होता. ‘अनेक वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण झालं’ असं म्हणत या क्षणाचा आनंद अजूनही उपभोग असल्याचं कार्तिकने नमूद केलं होतं.

एवढंच नव्हे तर हा राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर कार्तिक आर्यन, त्याच्या आई-वडिलांसोबत उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरातही पोहोचला होता. तेथे त्याने भगवान महाकालांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्याला मिळालेलं हे यश त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खास टप्प्यांपैकी एक मानलं जातं.

कॅप्टन इंडियासह अनेक प्रोजेक्ट्सवर करतोय काम

कार्तिक आर्यनच्या फिल्मी करिअरबद्दल सांगायचं झालं तर त्याची सातत्याने घोडदौड सुरू आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रँचायजी, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘भूल भुलैया 2′ आणि ‘भूल भुलैया 3′ यासारख्या अनेक चित्रपटातून त्याने त्याची चमक दाखवली. मात्र आगामी चित्रपटात व्यस्त असतानाच त्याला दुखापत झाल्याने फिल्मचं शूटिंग आणि त्याचं शेड्यूल यावर काय परिणा होतो, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. त्याला लौकर बरं वाचाव यासाठी ताहत प्रार्थना करत आहेत.

शिमित अमीन यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या ‘कॅप्टन इंडिया’ या चित्रपटाचे शूटिंगही कार्तिकला सुरू करायचं आहे. ‘चक दे! इंडिया’ सारखा बहुचर्चित चित्रपट देणाऱ्या शिमित अमिनच्या आगामी चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत पार्वती थिरुवोथुही दिसणार आहे.

Follow Us
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?