दरे गावातून शिंदेंची मोठी फिल्डिंग, अजित पवार गटाच्या शिलेदाराचा 2029मध्ये गेम फिक्स, उमेदवार ठरला? फादर, गॉडफादर पाठीशी

एकनाथ शिंदे यांच्याकडून 2029 च्या लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू असल्याचे समोर आले आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना शह देण्यासाठी शिंदेंनी गोगावलेंना कानमंत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडतंय?

दरे गावातून शिंदेंची मोठी फिल्डिंग, अजित पवार गटाच्या शिलेदाराचा 2029मध्ये गेम फिक्स, उमेदवार ठरला? फादर, गॉडफादर पाठीशी
Eknath Shinde Shiv Sena planning for raigad lok sabha
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 27, 2026 | 3:33 PM

2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रायगडमध्ये शिवसेनेकडून संभाव्य उमेदवाराची मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा आहे. सुनील तटकरे यांना आव्हान देण्यासाठी युवा नेत्याच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 2029 लोकसभा निवडणुकीसाठी रायगडात आतापासूनच राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेना युवा नेत्याला मैदानात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी दरे गावातील भेटीत त्यांना कानमंत्र दिल्याचीही चर्चा आहे. रायगडमध्ये निवडणुकीसाठी शिवसेनेकडून नवी रणनीती आखली जात असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. सुनील तटकरे यांच्या विरोधात कोणाला संधी मिळणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

नेमकं काय घडतंय?

2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रायगड मतदारसंघात शिवसेनेकडून आतापासूनच राजकीय फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना रायगडमध्ये राजकीय शह देण्यासाठी युवा नेते भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची शिवसेनेत जोरदार तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

Loading...

विकास गोगावलेंना मिळणार उमेदवारी?

2029 मध्ये होणाऱ्या रायगड लोकसभा निवडणुकीत विकास गोगावले हे शिवसेनेकडून उमेदवार असण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने पक्षांतर्गत हालचालींना वेग आल्याचे समजते. विकास गोगावले यांच्या संभाव्य उमेदवारीसाठी त्यांचे ‘फादर’ आणि ‘गॉडफादर’ दोघेही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरे गावातील भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास गोगावले यांना 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा कानमंत्र दिल्याची माहिती समोर येत आहे.

विकास गोगावलेंची मोर्चेबांधणीला सुरुवात

2029 च्या रायगड लोकसभा निवडणुकीचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून विकास गोगावले यांनी आतापासूनच मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

2024 मध्ये मोठ्या फरकाने विजय

दरम्यान, २०२४ मध्ये रायगड मतदारसंघामधून सुनील तटकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गिते यांना पराभूत केलं होतं. 82 हजारांहून अधिक मतांनी त्यांनी विजय साकारला होता. त्यामुळे आता 2029 मध्ये ही जागा शिंदे गटही लढवणार का? तेव्हा महायुतीचं चित्र कसं असणार, जागावाटपाचा फॉर्मुला कसा असणार, यालाही महत्त्व असणार, सध्यातरी शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींनी लक्ष वेधलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us