Eknath Shinde MNS: एकदा नाही दोनदा, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये फोनवरुन दोन वेळेस चर्चा, काय शिजतंय? मनसेत विलिन होणार?

 शिवसेनेत फुट पडते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत, शिवसेनेवरील ठाकरेंचा ताबा सुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते, तरीही राज ठाकरे शांत? अशी चर्चा दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Eknath Shinde MNS: एकदा नाही दोनदा, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये फोनवरुन दोन वेळेस चर्चा, काय शिजतंय? मनसेत विलिन होणार?
एकनाथ शिंदेंचा दुसऱ्यांदा राज ठाकरेंना फोन
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 1:21 PM

मुंबई : आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आलीय. त्याबाबत आज सुनावणी पार पडणार आहे. एकनाथ शिंदे गटाला कमकुवत करण्यासाठी शिवसेनेकडून 16 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आलीय. त्यामुळे आजचा दिवस एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेसाठी महत्वाचा मानला जातोय. दरम्यान, पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) फोन केल्याची माहिती आहे. यामुळे राजकीय वर्तुळात राज ठाकरेंच्या मौनाकडे शंकेच्या नजरेनं पाहिलंय जातंय. शिवसेनेत फुट पडतेय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत आहेत, शिवसेनेवरील ठाकरेंचा ताबा सुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते, तरीही राज ठाकरे शांत कसे? अशी चर्चा दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, ‘फोन पे चर्चा’ वरुन वेगळंच चित्र सध्या निर्माण झाल्याचं बोललं जातंय.

राज ठाकरेंसोबतसोबत ‘फोन पे चर्चा’

Rebel Shiv Sena MLA Eknath Shide spoke to MNS chief Raj Thackeray over phone twice. Shinde spoke to Thackeray

Rebel Shiv Sena MLA Eknath Shide spoke to MNS chief Raj Thackeray over phone twice. Shinde spoke to Thackeray about the recent political situation in Maharashtra and enquired about his health, an MNS leader confirmed

हे सुद्धा वाचा

— ANI (@ANI) June 27, 2022

राज ठाकरेंची बत्येतीची विचारपूस

एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींवर दोन्ही बड्या नेत्यांमध्ये काय भाष्य करण्यात आलं, काही चर्चा झाली का, याबाबत गुप्तता बाळगली जातेय.

राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा

एकनाथ शिंदे यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोनवर फोन येणं, यामागचं कारण का, अशीही चर्चा रंगली आहे. यामागच्यादोन शक्यता जाणून घ्या…

शिंदे गट मनसेसोबत जाण्याच्या 2 शक्यता

  1. सेनेतील ज्येष्ठ नेत्यांसमोर भवितव्याचा प्रश्न : आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचा भावी नेता म्हणून प्रोजेक्ट केलं जातंय. त्यात आपलं काय होणार, अशी शंका शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना सतावू लागली होती, अशी चर्चा आहे. राज ठाकरेंच्या बाबतीत सध्या तरी तसं नाही. सत्ता द्या, मी बदल घढजवून दाखवतो, अशी भूमिका राज ठाकरेंनी आपल्या सभेतून बोलून दाखवलेली होती. भाजपमध्ये जाण्याऐवजी मनसेत प्रवेश करुन भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली जास्त संयुक्तिक असू शकतात, असाही एक पर्याय असल्याचं बोललं जातं. शत्रूचा शत्रू, मित्र या म्हणीनुसार एकनाथ शिंदे गड मनसेत गेला तर आश्चर्य वाटायला नको.
  2. ठाकरेही सोबत आणि हिंदुत्वही : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही हिंदुत्व आणि ठाकरेंवरील श्रद्धा ही बंडखोरांना सोडता येणार नाही. त्यासाठी राज ठाकरेंसोबत गेल्यात दोन गोष्टी एकाच वेळी बंडखोरांना साधता येणार आहेत. एक म्हणजे हिंदुत्व आणि दुसरं म्हणजे ठाकरे हे नाव! हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंसोबत आम्ही गेलो, असा युक्तिवादही शिंदे गट करु शकतो. एककीडे काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात स्पर्धा करण्यासाठी यापुढे शिवसेनेत मर्यादा येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर थेट भाजप प्रवेश करण्याऐवजी मनसे हा त्यातल्या त्यात सुरक्षित पर्यात असू शकतो का, याचीही चाचपणी गेली जाण्याची शक्यताय.
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.