Election 2022 : नवी वॉर्ड रचना रद्द, 2017 च्या वॉर्डरचनेप्रमाणेच निवडणुका होणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

वॉर्ड रचनेप्रमाणे यंदाही निवडणूक घेण्याचा सरकारचा प्लॅन असल्याची ही माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांची समीकरणे पूर्णपणे हलवून टाकली आहेत. हा महाविकास आघाडीसाठी आणखी एक मोठा धक्का आहे.

Election 2022 : नवी वॉर्ड रचना रद्द, 2017 च्या वॉर्डरचनेप्रमाणेच निवडणुका होणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 5:43 PM

मुंबई : जेव्हापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Cm Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) झाले आहेत. तेव्हापासून ते महाविकास आघाडीला आणि गेल्या अडीच वर्षातल्या ठाकरे सरकारला एकापाठोपाठ एक मोठे धक्के देत आहेत. त्यातच आता या सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक मोठा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. या महापालिका निवडणुकीत जी (Election 2022) नवी वॉर्डर रचना तयार करण्यात आली होती. ती वॉर्ड रचना रद्द केल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. तसेच 2017 मध्ये ज्या वॉर्डरचनेप्रमाणे निवडणुका झाल्या होत्या. त्याच वॉर्ड रचनेप्रमाणे यंदाही निवडणूक घेण्याचा सरकारचा प्लॅन असल्याची ही माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांची समीकरणे पूर्णपणे हलवून टाकली आहेत. हा महाविकास आघाडीसाठी आणखी एक मोठा धक्का आहे.

कोरोनामुळे जनगणना झाली नाही

2017 ला जेवढी वॉर्ड संख्या होती, तेवढीच वॉर्ड संख्या यंदाही कायम राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. भाजपकडून आधीच मागणी करण्यात आली होती की जुन्या वार्ड रचनेप्रमाणे निवडणुका घेण्यात याव्या. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. कुठलीही जनगणना 2017 नंतर झालेली नाही. 2021 ला जनगणना अपेक्षित होती. मात्र कोरोना आल्यामुळेही जनगणनाही झाली नाही आणि त्याचमुळे आहेत तसंच वार्डचं गणित राहावं अशी भाजपची अपेक्षा होती. तसेच वाढवलेले वॉर्ड हे चुकीच्या पद्धतीने वाढवल्याचेही त्यांनी म्हटले होते.

भाजपचा आधीपासूनच विरोध होता

भाजपने या वॉर्डर रचनेला विरोध करत या संदर्भात अनेक निवेदनही सरकारला दिली होती. परंतु आता शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार असल्यामुळे महाविकास आघाडीचा हा निर्णय बदलण्यात आलेला आहे. येत्या काही दिवसात 11 ते 16 महापालिकांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. तर काही ठिकाणचे वॉर्ड वाढवलेले आहेत. त्यांना स्थगिती दिली जाणार आहे,  हेच बदल जिल्हा परिषदेतही अपेक्षित असणार आहे, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीसाठीही हाच निर्णय लागू राहणार आहे.

आरक्षणाचा विचार करून वॉर्ड रचना होणार

येणाऱ्या निवडणुकीत वॉर्ड रचनेवरती प्रभाव पडणारे आणखी एक मोठा फॅक्टर आहेत, त्यातला एक फॅक्टर म्हणजे आरक्षण आहे, ठरणार आहे कारण अलीकडेच आरक्षणाची समीकरणे ही बदललेली आहेत. त्याचा विचार करूनही नवी वॉर्ड रचना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे. ओबीसी आरक्षणावरही अनेक मोठे निर्णय झालेले आहेत. त्यांचाही विचार आगामी काळात वॉर्ड रचना बदलताना करण्यात येईल.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.