Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 1 सप्टेंबरपर्यंत भरात येणार उमेदवारी अर्ज

पुणे जिल्ह्यातील (Pune District) 61 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम (Gram Panchayat Election) जाहीर झाला आहे. त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील 38 आंबेगावमधील 18 आणि खेडमधील 5 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा समावेश आहे.

Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 1 सप्टेंबरपर्यंत भरात येणार उमेदवारी अर्ज
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 8:31 AM

पुणे :  पुणे जिल्ह्यातील (Pune District) 61 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम (Gram Panchayat Election) जाहीर झाला आहे. त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील 38 आंबेगावमधील 18 आणि खेडमधील 5 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा समावेश आहे. संबंधित ग्रामपंचयातींच्या निवडणुकीबाबत येत्या गुरुवारी तहसीलदारांकडून नोटीस जारी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना दिनांक 24 ऑगस्ट 2022  ते दिनांक 1 सप्टेंबर 2022  या कालावधीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. नव्या सररकारच्या आदेशानुसार  या सर्व ग्रामपंचयातींच्या सरपंचाची (Sarpanch) निवड थेट नागरिकांमधून होणार आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यातील दोनशे पेक्षा अधिक ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले होते. यामध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरला तर शिवसेनेला बंडखोरीचा मोठा फटका बसला. शिवसेनेने प्रतिष्ठापणाला लावलेल्या अनेक जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले होते. या निवडणुकीत देखील शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

सरपंचाची निवड थेट मतदारांमधून

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवड ही थेट जनतेमधून करण्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर काही ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये सरपचांची निवड थेट जनतेमधून झाली. मात्र त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तते आले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच पूर्वीच्या सरकारच्या निर्णयाला स्थगिती देत पुन्हा एकदा सरपंचाची निवड ही सद्यस्यांमधून सुरू झाली. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात भाजपाचे सरकार आले आहे.  महाविकास आघाडीच्या निर्णयाला स्थगिती देऊन सरपंचाची निवड थेट जतनेमधून करण्याचा पूर्वीचा निर्णय पुन्हा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता या 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सुद्धा सरपंचांची निवड थेट जनतेमधून होणार आहे.

हे सुद्धा वाचा

कोण बाजी मारणार?

नुकतेच 200 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींचे निकाल लागले. या निवडणूक निकालामध्ये बाजी मारत भाजप नंबर एकचा तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. शिवसेनेला मात्र बंडखोरीचा मोठा फटका बसला. ज्या जागांवर शिवसेनेचा विजय निश्चित होता अशा अनेक जागांवर शिंदे गटाचा विजय झाला. त्यामुळे शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या घटली. दुसरीकडे पुणे जिल्ह्या सध्या तरी भाजप आणि राष्ट्रवादीचे प्राबल्य दिसत असून, या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चूरस पहायला मिळण्याची शक्यता आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.