AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe : साहेब मी तुमच्याच जातीचा… कारवाईतून बचावासाठी थेट तुकाराम मुंढेंना फोन, FDA आयुक्तांनी उलगडला थरारक किस्सा

Tukaram mundhe bribe offer story : कडक शिस्तीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपल्या पहिल्याच पोस्टिंगदरम्यान घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. आता सध्या एफडीए आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या मुंढेंना फोनवर त्या व्यक्तीने नेमकं काय सांगितलेलं? जाणून घ्या हा किस्सा

Tukaram Mundhe : साहेब मी तुमच्याच जातीचा... कारवाईतून बचावासाठी थेट तुकाराम मुंढेंना फोन, FDA आयुक्तांनी उलगडला थरारक किस्सा
Tukaram Mundhe Latest NewsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 08, 2026 | 9:46 PM
Share

FDA आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडक कारवायांमुळे चर्चेत असतात. दिवाळीपूर्वीही विभागाने अनेक ठिकाणी धाडी टाकून अनेक कारवाया करत अटक आणि माल जप्त केला आहे. भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधातील त्यांच्या धडाकेबाज कारवायांचं कौतुक आणि चर्चा फक्त महाराष्ट्रातच नाही तर ती देशभरात होत आहे. दरम्यान मुंढेंनी एक पहिल्या पोस्टिंगमधला किस्सा सांगितला आहे. जो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

तुम्हाला कधी कोणी पैसे म्हणजे लाच देण्याचा प्रयत्न केला का? या प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढे यांनी सांगितलं की, २००७ मध्ये मला पहिल्या पोस्टिंगमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी असताना असा प्रकार घडला होता. तेव्हा रेशन धान्याची तस्करी करणारा ट्रक रात्रभर पाळत ठेवून पकडलेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माक्ष एका व्यक्तीने फोन करुन अप्रोच करण्याचा प्रयत्न केला होता, असा थरारक किस्सा त्यांनी सांगितला.

लोकमतच्या मुलाखतीत बोलताना तुकाराम मुंढे यांनी हा किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले की, मला आत्तापर्यंत कोहीही पैसे देण्याची ऑफर केलेली नाही. पण अप्रोच करण्याचा प्रयत्न मात्र झाला होता, तेव्हा मलाही धक्का बसलेला, असं त्यांनी सांगितलं. मला देगलूरला पोस्टिंगवर असताना टीप मिळालेली. त्यानंतर मी माझा चालक आणि तलाठी आम्ही त्याठिकाणी जाऊन रात्रभर पाळत ठेवून रेशनच्या तस्करीचा ट्रक पकडलेला. त्यामध्ये गहू, तांदूळ होते. आम्ही तो कार्यालयात आणून लावला.

दुसऱ्या दिवशी मला फोन आला. कार्यलयात बसल्यानंतर हा फोन ऐकून मी थक्क झालो. तो साहेब मी तुमच्याच जातीचा आहे, असं तो व्यक्ती बोलत होता. मी त्या व्यक्तीला सांगितलं मी तुम्हाला ओळखत नाही. नंतर तो म्हणाला की तुम्ही गाडी पकडली ती माझी आहे. माझी मदत करा, खरंतर मला जात ही गोष्टच पटत नाही. त्यानंतर मी त्याला म्हटलं की, तुम्ही फोन केला पण समोर या मग काय मदत करायची ती करतो असं मी मोठ्या आवाजात बोलताच त्या व्यक्तीने फोन कट केला. त्यानंतर आम्ही त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आणि कायदेशीर कारवाई केल, त्याचवेळी ही एकमेव घटना आहे, असंही मुंढेंनी नमूद केलं.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा