AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gunratna Sadavarte Satara Police: अखेर सातारा पोलीसांकडे गुणरत्न सदावर्तेंचा ताबा, चौकशीसाठी घेऊन गेले

गुणरत्न सदावर्तेंना घेऊन सातारा पोलिस साताऱ्याकडे रवाना

Gunratna Sadavarte Satara Police: अखेर सातारा पोलीसांकडे गुणरत्न सदावर्तेंचा ताबा, चौकशीसाठी घेऊन गेले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 14, 2022 | 11:51 AM
Share

मुंबई – साताऱ्यामध्ये गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्यावरती एक गुन्हा दाखल झाला आहे. मराठा आरक्षणाच्याबाबत एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं होतं.  या अनुशंगाने गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती सातारा शहर पोलिस ठाण्यात (Satara Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. साधारण दीड वर्षापुर्वी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल झालेल्या तक्रारीवरती अद्याप सातारा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. सातारा पोलिसांनी चौकशीसाठी सरकारकडे ताबा मागितला होता. सरकारच्या मंजूरीनंतर चौकशीसाठी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तब्ब्ल 60 ते 70 पोलिसांच्या बंदोबस्तात सदावर्ते साताऱ्यात घेऊन जात आहेत. साधारण चारवाजेपर्यंत पोलिसांचा ताफा साताऱ्यात पोहोचेल.

आंदोलकांना भडकविल्याचा आरोप

एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केल्यापासून गुणरत्न सदावर्ते अधिक चर्चेत आहेत. मागील पाच महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी आपल्या मागण्यांवरती ठाम आहे. हे आंदोलन राज्यभरात सुरू असून त्याचा एसटीला चांगलाचं अर्थिक फटका बसला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. परंतु राज्य शासनात आमचं तात्काळ विलीनीकरण व्हावं या मागणीसाठी कर्मचारी हटून बसले आहेत. काही एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावरती हल्ला केला. आंदोलकांना भडकवणे, कट रचणे, सरकारी कामात अडथळा आणणे या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. सदावर्ते यांना ताब्यात घेतल्यानंतर चार दिवस पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं

आठ एप्रिलला गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी त्यांना कोर्टात हजर केले असता, सुरूवातीचे चार त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच काल त्यांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आज सकाळी गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यात आला. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या वादग्रस्त विधानाविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने सगळ्यांचे लक्ष आता सातारा पोलिसांकडे लागले आहे.

Gunratna Sadavarte Satara Police: अखेर सातारा पोलीसांकडे गुणरत्न सदावर्तेंचा ताबा, चौकशीसाठी घेऊन गेले

Ganesh Naik | नर्स किंवा शाळेचा युनिफॉर्म घालवून नाचायला लावायचे, गणेश नाईकांवर महिलेचे गंभीर आरोप

Mumbai Indians : सलग 5 वेळेस पराभूत होऊनही चॅम्पियन बनू शकतो इंडियन्स, फक्त हा फॉर्म्यूला वापरावा लागेल?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.