औरंगाबादचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला (FIR filed against Shivsena MLA Sanjay Shirsat). त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

FIR filed against Shivsena MLA Sanjay Sirsat, औरंगाबादचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला (FIR filed against Shivsena MLA Sanjay Shirsat). त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे पश्चिम विधानसभा संघटक सुशील खेडकर यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. आमदार शिरसाट आणि सुशील खेडकर यांच्यात सातारा देवळाईतील रस्ते कामाच्या कंत्राटावरून जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले (FIR filed against Shivsena MLA Sanjay Shirsat).

मागील अनेक दिवसांपासून आमदार शिरसाट आणि पश्चिम विधानसभा संघटक सुशील खेडकर यांच्यात सातारा देवळाईतील रस्ते कामाच्या कंत्राटावरून वाद सुरु आहे. यातूनच शनिवारी (18 जानेवारी) दुपारी कोकणवाडी येथील आमदार शिरसाट यांच्या कार्यालयासमोर दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. या घटनेत खेडकर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार शिरसाट यांच्या जखमी समर्थकांनी देखील घाटीत जाऊन उपचार घेतले.

शिरसाट यांनी बोलावल्यामुळेच आपण दुपारी त्यांच्या कार्यालयासमोर गेलो. तेथे गेल्यावर आमदार शिरसाट यांनी सातारा देवळाईतील टेंडर मागे घेण्यास सांगितले. मी त्यांना नकार दिल्याने त्यांनी गालावर चापट मारली आणि शिवीगाळ केली. त्याचवेळी येथे असलेल्या उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी कॉलर पकडून ओढून मानेवर चापट मारली. राजू राजपूत यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अनिल बरारे यांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केले. निलेश नरवडे यांनीही मारहाण केली.

यावेळी अनुप मुंदडा आणि दिलीप हेकडे मध्यस्थी करण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण करून जखमी केले, अशी तक्रार खेडकर यांनी केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार शिरसाट, उपमहापौर जंजाळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान 324, 323, 504, 506, 143, 147, 148 आणि 149 नुसार गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सुशील खेडकर, अनुप मुंदडा, दिलीप हेकडे यांच्यासह अन्य काही लोकांनी कार्यालयासमोर येऊन आमचा रस्ता अडवला आणि शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार दिली, आमदार शिरसाट समर्थक अनिल बिरारे यांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *