AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुकीला माफी नाही; याकूब मेमन प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. यावर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चुकीला माफी नाही; याकूब मेमन प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 09, 2022 | 11:37 AM
Share

मुंबई :  मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. याकूब मेमन याची कबर फुलांनी सजवण्यात आल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपाने शिवसेनेवर (Shiv sena) टीकेची झोड उठवली. भाजप नेते आशिष शेलार यांनी तर पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधाला. मात्र या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याकूब मेमन (Yakub Memon) प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत, जे चुकीचे आहेत त्यांच्यावर कारवाई होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटले मुख्यमंत्री?

याकूब मेमन प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते फडणवीसांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी याविषयावर जास्त बोलणे टाळले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जे चुकीचे आहे त्यांच्यावर कारवाई होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

शेलारांची टीका

दरम्यान त्यापूर्वी आशिष शेलार यांनी देखील शिवसेनेवर याकूब मेमन प्रकरणात जोरदार टीका केली आहे.  पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तर दुसरीकडे या प्रकरणाचा आणि महापालिका तसेच शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे.

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.