AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : गडकरींचा साधेपणा भावला! बडेजाव न करता वाहतूक नियमांचे पालन करत प्रवास

नितीन गडकरी यांच्या साधेपणाचे दर्शन पुन्हा एकदा मुंबईकरांना झाले आहे. सर्व वाहतूक नियमांचे पालन करत गडकरी यांनी मुंबईच्या रस्त्यावरून सामान्य मानसा सारखा प्रवास केला. मुंबईकरांकडून गडकरींच्या या कृतीचे कौतुक होत आहे.

Video : गडकरींचा साधेपणा भावला! बडेजाव न करता वाहतूक नियमांचे पालन करत प्रवास
| Updated on: Jul 08, 2022 | 3:09 PM
Share

मुंबई: अनेक जण सर्रासपणे वाहतूक नियम (Traffic rules) धाब्यावर बसून प्रवास करताना दिसतात. वाहतूक नियमांचे अनेकदा उल्लंघन होते. मात्र मुंबईच्या (mumbai) रस्त्यावर आज एक वेगळच चित्र पहायला मिळालं. हे चित्र मोठे अश्वासक होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) मुंबईच्या रस्त्यावरून प्रवास करताना ‘टीव्ही 9’ च्या कॅमेऱ्यात कैद झाले. मंत्रीपदाचा कुठलाही बडेजावपणा न करता ते सर्व वाहतूक नियमांचे पालन करत प्रवास करत होते. यावेळी ते मुंबईच्या हाजीअली परिसरात एकदा ट्रॅफिकमध्ये देखील अडकले. मात्र मंत्री असण्याचा कोणताही फायदा न घेता त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवरून सामान्य माणसांसारखा प्रवास केला. नितीन गडकरींच्या या कृतीचे मुंबईकरांकडून कौतुक होत आहे. हा सर्व प्रसंग टीव्ही 9 च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

वाहतूक नियमांचे पालन करत प्रवास

नितीन गडकरी हे मुंबईच्या रस्त्यांनी प्रवास करताना दिसते. ते एक केंद्रीय मंत्री असून देखील त्यांनी कोणताही बडेजाव न करता अगदी सामान्य प्रवाशासारखा प्रवास केला. सामान्य प्रवाशी देखील कधीकधी वाहतूक नियमांचे उंल्लघन करतात. मात्र नितीन गडकरी यांनी वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटोकोरपणे पालन करत प्रवास केला. या प्रवासादरम्यान हाजीआली परिसरात एकदा वाहतूककोंडीत देखील अडकले होते.

गडकरी डॉक्टर ऑफ सायन्सने सन्मानित

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डॉ. पंजाबराव देशमुख  कृषी विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देण्यात आली.  कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पदवी प्रदान करून गडकरी यांना गौरवण्यात आले. गडकरी यांनी कृषी क्षेत्राला दिलेला जोडधंद्याचा मंत्र आणि त्यातून होत असलेली शेतकऱ्यांची प्रगती पहाता त्यांना  डॉ. पंजाबराव देशमुख  कृषी विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर ऑफ सायन्स  पदवी बहाल करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठांनी सहाव्या वेतन आयोगाच्या आधी शेतकरी कसा अधिकाधिक सक्षम होईल. आपले संशोधन कसे त्याच्या उपयोगी पडेल हे पहावे असे प्रतिपादन यावेळी नितीन गडकरी यांनी केल आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?