AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी ठाकरे सरकारने मुंबई पालिका आयुक्तपदावरुन हटवलं, आता परदेशींनी काही तासातच पद नाकारलं

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवीण परदेशी यांना ठाकरे सरकारने मराठी भाषा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी दिल्यानंतर, अवघ्या काही तासातच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.

आधी ठाकरे सरकारने मुंबई पालिका आयुक्तपदावरुन हटवलं, आता परदेशींनी काही तासातच पद नाकारलं
Praveen Pardeshi
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 5:19 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अधिकारी अशी ओळख असलेले सनदी अधिकारी प्रवीण परदेशी (Praveen Pardesi) यांनी ठाकरे सरकारला पुन्हा एकदा वाकोल्या दाखवल्या आहेत. कारण नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवीण परदेशी यांना ठाकरे सरकारने मराठी भाषा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी दिल्यानंतर, अवघ्या काही तासातच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. इतकंच नाही तर परदेशी हे केंद्र सरकारच्या नॅशनल कॅपिसिटी बिल्डिंग कमिनशने सदस्य म्हणून प्रशासनात रुजू झाले आहेत. (Former BMC Commissioner Praveen Pardeshi quits state post ACS Marathi Bhasha Department hours after appointment joins Centres NCBC)

कोरोना काळात ठाकरे सरकारने प्रवीण परदेशी यांना मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन हटवलं होतं. त्यानंतर त्यांची अन्य विभागात बदली झाली. मग परदेशी हे राज्याच्या मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत होते. पण इथेही त्यांच्या पदरी निराशा आली. यानंतर ठाकरे सरकारने कालच 7 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यावेळी प्रवीण परदेशी यांना मराठी भाषा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी दिली होती.  मात्र परदेशींनी अवघ्या काही तासातच राजीनामा देऊन, केंद्रात जाणे पसंत केलं.

मुंबई आयुक्तपदावरुन हटवलं 

ठाकरे सरकारने मे 2020 मध्ये  तत्कालिन मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली केली होती. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आवरत नसल्याने ही कारवाई केल्याचं सांगण्यात आलं होतं.  प्रवीण परदेशी यांना नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली होती.

प्रविण परदेशी यांनी मे 2019 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. याआधी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं होतं. परदेशी यांनी आपल्या 29 वर्षांच्या कार्यकाळात लातूर आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिलं आहे.

कोण आहेत प्रवीण परदेशी?

प्रवीण परदेशी हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

प्रवीणसिंह परदेशी संयुक्त राष्ट्रसंघात (UNITAR) Global Programme Coordinator म्हणून कार्यरत होते

परदेशींनी मे 2019 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा भार स्वीकारला होता.

प्रवीण परेदशी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी असल्याचं सांगण्यात येतं

परदेशींनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे.

फडणवीसांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, वन, पर्यावरण, अर्थ, नगर विकास व महसूल अशा विविध विभागांत जबाबदारी सांभाळलेली आहे.

1993 मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होता तेव्हा परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते.

लातूरमधील कामाचा धडाका पाहून परदेशींची मोठी प्रशंसा झाली होती.

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लगेचच परदेशी यांना आपल्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी आणले होते.

परदेशी यांच्यावर फडणवीस यांनी नेहमीच विश्वास दाखवला होता.

पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

याशिवाय मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं

संबंधित बातम्या 

परदेशींकडे मराठी भाषा डिपार्टमेंट, तीन नव्या दमाच्या IAS ना सीईओची पोस्टिंग, ठाकरे सरकारकडून 7 मोठ्या बदल्या

मुख्य सचिवपदासाठी ‘बॅचमेट्स’मध्ये चुरस, सीताराम कुंटे-प्रवीण परदेशींमध्ये बाजी कोण मारणार?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.