मुख्य सचिवपदासाठी ‘बॅचमेट्स’मध्ये चुरस, सीताराम कुंटे-प्रवीण परदेशींमध्ये बाजी कोण मारणार?

मुख्य सचिवपदासाठी 'बॅचमेट्स'मध्ये चुरस, सीताराम कुंटे-प्रवीण परदेशींमध्ये बाजी कोण मारणार?

सीताराम कुंटे हे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. तर प्रवीणसिंह परदेशी संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर आहेत. (Maharashtra Chief Secretary post)

अनिश बेंद्रे

|

Jan 20, 2021 | 11:27 AM

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या निवृत्तीनंतर कोणाची वर्णी लागणार, याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलं आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर असलेले प्रवीणसिंह परदेशी यांच्यात मुख्य सचिवपदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Chief Secretary post Sitaram Kunte or Praveen Singh Pardeshi)

मुख्य सचिव संजय कुमार पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी वर्णी लावण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु असल्याची चर्चा मंत्रालयात आहे. सीताराम कुंटे हे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. तर प्रवीणसिंह परदेशी संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर आहेत.

कोण आहेत सीताराम कुंटे?

 • सीताराम कुंटे हे 1985 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी
 • गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून सध्या कार्यरत
 • सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही सेवा
 • 2012 ते 2015 या कालावधीत मुंबई महापालिकेचे आयुक्तपद
 • मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम पाहिले
 • महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक विभाग हाताळण्याचा अनुभव
 • महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून अनुभव

कोण आहेत प्रवीण परदेशी?

 • प्रवीण परदेशी हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
 •  प्रवीणसिंह परदेशी संयुक्त राष्ट्रसंघात (UNITAR) Global Programme Coordinator म्हणून कार्यरत
 • परदेशींनी मे 2019 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा भार स्वीकारला होता.
 • प्रवीण परेदशी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी असल्याचं सांगण्यात येतं
 • परदेशींनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे.
 • फडणवीसांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, वन, पर्यावरण, अर्थ, नगर विकास व महसूल अशा विविध विभागांत जबाबदारी सांभाळलेली आहे.
 • 1993 मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होता तेव्हा परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते.
 • लातूरमधील कामाचा धडाका पाहून परदेशींची मोठी प्रशंसा झाली होती.
 • देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लगेचच परदेशी यांना आपल्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी आणले होते.
 • परदेशी यांच्यावर फडणवीस यांनी नेहमीच विश्वास दाखवला होता.
 • पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

कुंटे-परदेशी एकाच बॅचचे

कुंटे आणि परदेशी एकाच बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत. दोघेही येत्या नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणार आहेत. म्हणजेच दोघांपैकी एकाची नियुक्ती झाली, तर मुख्य सचिवपदाचा कार्यकाळ हा नऊ महिन्यांचाच असेल. (Maharashtra Chief Secretary post Sitaram Kunte or Praveen Singh Pardeshi)

तिन्ही पक्षांचे कोणाच्या नावावर एकमत?

मुख्य सचिवासारख्या महत्त्वाच्या पदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, हे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजॉय मेहता यांची निवडही महत्त्वाची मानली जाते.

संजय कुमार यांना ‘रेरा’चे अध्यक्षपद?

महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटीचे (रेरा) अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे. त्यानंतर
विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार यांची निवृत्तीनंतर ‘रेरा’चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील महिन्यात निवृत्त होत असलेले एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव हेही याच पदासाठी इच्छुक असल्याचे मानले जाते. चॅटर्जी यांचीही निवृत्तीनंतर महारेरामध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

राजू शेट्टींचा मुद्द्याला हात, महाविकास आघाडीवर पुन्हा घणाघात

(Maharashtra Chief Secretary post Sitaram Kunte or Praveen Singh Pardeshi)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें