मेधा कुलकर्णींनी पंतप्रधानांना बांधली राखी, कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांसाठी महत्वाचं मागणं

मेधा कुलकर्णी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखीही बांधली. या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवारवाड्याच्या जिर्णोद्धारासाठी निधी, आदी विषयांवर चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिलीय. तसंच कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांसाठीही मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महत्वाची मागणी केली आहे.

मेधा कुलकर्णींनी पंतप्रधानांना बांधली राखी, कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांसाठी महत्वाचं मागणं
माजी आमदार मेधा कुलकर्णींनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 3:23 PM

पुणे : कोथरुड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी आमदार आणि भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मेधा कुलकर्णी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखीही बांधली. या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवारवाड्याच्या जिर्णोद्धारासाठी निधी, आदी विषयांवर चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिलीय. तसंच कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांसाठीही मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महत्वाची मागणी केली आहे. (Medha Kulkarni tied rakhi for PM Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत येथे भेट घेतली. कोरोना काळात वैधव्य आलेल्या महिलांना एकरकमी 5 लाख ₹ अथवा दरमहा 5000 ₹ वेतन देण्यात यावे यासाठी आपण राज्य सरकारांना सूचना करावी अशी विनंती मी माननीय पंतप्रधानांकडे केली. या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवार वाड्याच्या जीर्णोद्धारासाठी निधी आदी विषय देखिल मी माननीय पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत मांडले. मोदीजींनी या सर्व मुद्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला, असं ट्वीट मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे.

त्याचबरोबर पंतप्रधान मोदींसोबतची ही भेट म्हणजे अलौकिक, अद्वितीय व्यक्तिमत्वाची अविस्मरणीय भेट असल्याचंही मेधा कुलकर्णी यांनी म्हटलंय.

आपल्या दिल्ली दौऱ्यात मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचीही भेट घेतली. त्यावेळी त्यांनी केंद्रीय वित्तमंत्री (राज्य) डॉक्टर भागवत कराड यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. रुपी बँक संघटनेचे पत्र त्यांना देऊन लक्ष घालण्याची विनंती केली. त्यांनी या विषयात केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बरोबर चर्चा करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती त्यांनी दिलीय.

तसंच केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांची दिल्ली येथे भेट घेऊन लसीकरण मोहीम, त्यातील अडथळे, छोट्या खाजगी रुग्णालयांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, आणि इतरही काही मुद्द्यांबाबत निवेदन दिले. चर्चा केली. डॉ भारती ताई यांनी तातडीने या विषयावर त्यांच्या अधिकार्‍यांना सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या : 

पाठीत खंजीर खुपसला ते भविष्यात युतीचा विचार! चंद्रकांत पाटलांची एकाच वेळी दोन परस्परविरोधी वक्तव्ये

अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणारच, दिवाणी आणि फौजदारी गुन्हेही दाखल होणार; सोमय्यांचा दावा

Medha Kulkarni tied rakhi for PM Narendra Modi

शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.