AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj thackeray | पुण्यातील मोठा नेता मनसेच्या वाटेवर, राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का देणार?

Raj thackeray | राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. सध्या विरोधी पक्षातले नेते सत्ताधारी गटात सहभागी होत आहेत. त्याचवेळी विरोधी पक्षातला एक नेता मनसेमध्ये प्रवेश करु शकतो. पुणे जिल्ह्यातील या नेत्याचा त्या भागात दांडगा जनसंर्पक आहे. तो आमदार सुद्धा होता.

Raj thackeray | पुण्यातील मोठा नेता मनसेच्या वाटेवर, राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का देणार?
Raj Thackeray-Eknath Shinde
| Updated on: Feb 14, 2024 | 8:04 AM
Share

पुणे (योगेश बोरसे) : सध्या विरोधी पक्षातील नेत्यांचा सत्ताधारी पक्षाकडे कल वाढू लागला आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते सध्या शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. कालच काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्याआधी बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. या दोघांच्याआधी मिलिंद देवरा यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हे तिन्ही नेते विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसचे सदस्य होते. विरोधी पक्षातून सत्ताधारी गटात येण्यासाठी चढाओढ सुरु असताना एक सत्ताधारी पक्षातला नेता विरोधी पक्षात जाऊ शकतो. महत्त्वाच म्हणजे विधिमंडळ, पालिका स्तरावर फार मोठी ताकद नसलेल्या पक्षात हा नेता प्रवेश करु शकतो. हा बडा नेता पुणे जिल्ह्यातून येतो.

जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे पुन्हा आपल्या स्वगृही परतण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यानंतर शरद सोनवणे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी झाले होते. शरद सोनवणे यांच्याकडे सध्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. पण तेच शरद सोनावणे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करु शकतात. सध्या राज्यात राजू पाटील यांच्या रुपाने मनसेचा एकमेव आमदार आहे. त्यांच्याआधी शरद सोनावणे यांच्या रुपाने मनसेचा एकमेव आमदार होता.

राज ठाकरेंसोबत हा नेता कुठे दिसला?

शिवसेनेत असणारे शरद सोनावणे 2014 च्या विधानसभा निवडणुकीआधी मनसेत प्रवेश करुन आमदार झाले होते. त्यावेळी ते मनसेचे एकमेव आमदार होते. त्या नंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकीटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. आता शरद सोनावणे स्वगृही म्हणजे मनसेमध्ये परतण्याची शक्यता आहे. ओझर येथील कार्यक्रमात शरद सोनवणे हे राज ठाकरेंसोबत पाहायला मिळाले. त्यामुळे ही शक्यता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
Video | पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता...
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत
सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
Parbhani | सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! परभणीत वादळी पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं प्रकरण काय?
महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर ठोंबरेंचा घणाघात
Rupali Chakankar | महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरेंचा घणाघात!