भाजपचे डॅमेज कंट्रोल, पुणे महापालिकेत संजय काकडे समर्थक नगरसेवकांची ‘स्थायी’वर वर्णी

भाजपकडून स्थायी समितीवर संधी देताना प्रामुख्याने आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नेमणुका झाल्याचं दिसत आहे. (Sanjay Kakade supporter corporators )

भाजपचे डॅमेज कंट्रोल, पुणे महापालिकेत संजय काकडे समर्थक नगरसेवकांची 'स्थायी'वर वर्णी
माजी खासदार संजय काकडे
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 8:29 AM

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीवर माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांच्या समर्थकांची वर्णी लागली. सत्ताधारी भाजपकडून संजय काकडे यांच्या तीन समर्थक नगरसेवकांना पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत स्थान मिळाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने डॅमेज कंट्रोल केल्याचे बोलले जाते. (Former MP Sanjay Kakade supporter corporators on Pune Municipal Standing Committee)

स्थायी समितीवर रिक्त झालेल्या आठ जागांसाठी भाजपकडून विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने, राहुल भंडारे, राजाभाऊ लायगुडे, अर्चना पाटील, मनीषा कदम आणि महेश वाबळे या सहा जणांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून स्थायी समितीवर संधी देताना प्रामुख्याने आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नेमणुका झाल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडू तात्या गायकवाड आणि प्रदीप गायकवाड यांची पुणे महापालिकेच्या स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

काकडे-पटोले भेटीने चर्चेला उधाण

माजी खासदार संजय काकडे हे पुण्यात तत्कालीन विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भेटीला गेले होते. नोव्हेंबर महिन्यात नाना पटोले आणि संजय काकडे यांच्यात झालेली ‘डिनर पे चर्चा’ दीड तास रंगली होती. बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेचा विषय ठरली होती.

भाजपचे डॅमेज कंट्रोल

सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि निवडणुकीच्या मॅनेजमेंटसाठी संजय काकडे राजकीय वर्तुळात ओळखले जातात. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमधील नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक नेते महाविकास आघाडीत येण्यास उत्सुक असल्याचीही चर्चा आहे. मात्र, संजय काकडे यांनी हे सर्व दावे फेटाळले होते. नाना पटोले हे माझे जुने मित्र आहेत. आम्ही केवळ जेवणाच्या निमित्ताने भेटलो होतो. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे संजय काकडे यांनी स्पष्ट केले होते. आता काकडे समर्थक नगरसेवकांना स्थायीत स्थान देत भाजपनेही काहीसे डॅमेज कंट्रोल केल्याचं दिसत आहे.

संजय काकडेंचे भाकित

काही दिवसांपूर्वी संजय काकडे यांनी राज्यात आगामी काळात पवार-ठाकरे पॅटर्न येऊ शकतो, असे भाकीत वर्तविले होते. महाविकास आघाडीने यापुढील निवडणुका एकत्र लढवल्या, तर ती आमच्यासाठी धोक्याची घंटा असेल. आगामी निवडणुकासंदर्भात महाविकास आघाडीचे जागावाटपही निश्चित झाले आहे, असे संजय काकडे यांनी सांगितले होते.

कोण आहेत संजय काकडे?

संजय काकडे हे भाजपच्या पाठिंब्याने 2014 मध्ये राज्यसभेवर निवडून आले होते. अपक्ष म्हणून ते खासदारपदी निवडून आले, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एप्रिल 2020 मध्ये त्यांच्या खासदारकीची मुदत संपली. काकडे हे व्यवसायाने रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. भाजप प्रवेशापूर्वी अजित पवार यांच्याशी काकडेंचे जवळचे संबंध होते.

संबंधित बातम्या :

माजी खासदार संजय काकडेंची सपत्नीक कोर्टात हजेरी, मेहुण्याला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणात जामीन

पुण्यात नाना पटोले आणि संजय काकडेंची ‘डिनर पे चर्चा’; राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या

(Former MP Sanjay Kakade supporter corporators on Pune Municipal Standing Committee)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.