AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात नाना पटोले आणि संजय काकडेंची ‘डिनर पे चर्चा’; राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या

नाना पटोले आणि संजय काकडे यांची ही 'डिनर पे चर्चा' साधारण दीड तास सुरु होती. | Sanjay Kakde

पुण्यात नाना पटोले आणि संजय काकडेंची 'डिनर पे चर्चा'; राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या
| Updated on: Nov 09, 2020 | 12:16 PM
Share

पुणे: राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची पुण्यात भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नाना पटोले आणि संजय काकडे यांची ही ‘डिनर पे चर्चा’ साधारण दीड तास सुरु होती. राज्यातील झपाट्याने बदलत असलेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे. (Nana patole and sanjay kakade take dinner together in Pune)

मात्र, संजय काकडे यांनी हे सर्व दावे फेटाळले आहेत. नाना पटोले हे माझे जुने मित्र आहेत. आम्ही केवळ जेवणाच्या निमित्ताने भेटलो होतो. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे संजय काकडे यांनी स्पष्ट केले.

सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि निवडणुकीच्या मॅनेजमेंटसाठी संजय काकडे राजकीय वर्तुळात ओळखले जातात. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमधील नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक नेते महाविकासआघाडीत येण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे. याशिवाय, मध्यंतरी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ‘आम्ही तुमचे बाप आहोत’ असे सुनावले होते. त्यामुळे आगामी काळात पुण्यातील राजकारण रंजक ठरण्याची चिन्हे आहेत.  या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले आणि संजय काकडे यांच्या भेटीदरम्यान नक्की काय घडले, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

काही दिवसांपूर्वी संजय काकडे यांनी राज्यात आगामी काळात पवार-ठाकरे पॅटर्न येऊ शकतो, असे भाकीत वर्तविले होते. महाविकास आघाडीने यापुढील निवडणुका एकत्र लढवल्या, तर ती आमच्यासाठी धोक्याची घंटा असेल. आगामी निवडणुकासंदर्भात महाविकास आघाडीचे जागावाटपही निश्चित झाले आहे, असे संजय काकडे यांनी सांगितले होते.

सरकार पाडायला हिम्मत नाही लागत, तो सगळा नंबर गेम असतो. आमचं सरकार जसं आमच्या कर्माने गेलं, तसं हे सरकार देखील त्यांच्या कर्माने जाणार आहे, असेही संजय काकडे यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

माजी खासदार संजय काकडेंची सपत्नीक कोर्टात हजेरी, मेहुण्याला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणात जामीन

पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार, जागावाटपही निश्चित, आमच्यासाठी धोक्याची घंटा : संजय काकडे

उद्धव ठाकरेंकडे इटली-अमेरिकेपेक्षा अधिक दूरदृष्टी, ठाकरेंकडे पाहूनच मोदींचा ‘तो’ निर्णय : संजय काकडे

(Nana patole and sanjay kakade take dinner together in Pune)

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.