AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EXCLUSIVE: पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार, जागावाटपही निश्चित, आमच्यासाठी धोक्याची घंटा : संजय काकडे

भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांनी आगामी काळातील राजकीय समीकरणांविषयी मोठे दावे केले आहेत (Sanjay Kakade comment on Pawar Thackeray pattern).

EXCLUSIVE: पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार, जागावाटपही निश्चित, आमच्यासाठी धोक्याची घंटा : संजय काकडे
| Updated on: Jul 24, 2020 | 4:09 PM
Share

पुणे : भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांनी आगामी काळातील राजकीय समीकरणांविषयी मोठे दावे केले आहेत (Sanjay Kakade comment on Pawar Thackeray pattern). पुढील निवडणुकीत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार आहे, अशी राजकीय भविष्यवाणी संजय काकडे यांनी केली आहे. यावेळी या राजकीय घडामोडी आमच्यासाठी धोक्याची घंटा असेल असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

माजी खासदार संजय काकडे म्हणाले, “महाविकास आघाडीने यापुढील निवडणुका एकत्र लढवल्या, तर ती आमच्यासाठी धोक्याची घंटा असेल. आगामी काळात पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार आहे. मागील 3 महिन्यांपासून त्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. आगामी निवडणुकासंदर्भात महाविकास आघाडीचं जागावाटपही निश्चित झालं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“सरकार पाडायला हिम्मत नाही लागत, तो सगळा नंबर गेम असतो. आमचं सरकार जसं आमच्या कर्माने गेलं, तसं हे सरकार देखील त्यांच्या कर्माने जाणार आहे. आमचं सरकार होतं त्यावेळी शिवसेना खिश्यात राजीनामे घेऊन फिरायची. आता त्याचं काय झालं?” असा सवालही त्यांनी शिवसेनेला विचारला. तसेच आता आम्हाला सावध राहण्याची गरज आहे, असं मत व्यक्त केलं.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, महाविकासआघाडीने आगामी निवडणुका एकत्र लढण्याबाबत राजकीय घडामोडी घडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी (23 जुलै) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात दोघांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली होती. या बैठकीत राज्यातील पुढील निवडणुका एकत्र लढवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बैठकीत उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापुढे आपल्याला महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहायचं आहे. तसेच पुढील निवडणुकाही एकत्र लढवायच्या आहेत, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी राज्यातील पुढील निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला तर भाजपला नुकसान होईल का? या प्रश्नाचं उत्तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिलं. “तिन्ही पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. खरं म्हणजे आमचे 105 आमदार निवडून आले आहेत. आमच्या पाठीमागे जनतेचा एवढा मोठा पाठिंबा आहे. त्यावेळी आमच्यासोबत शिवसेना होती. पण त्यांनी आमची साथ सोडली. पण, आता जनताच ठरवेल. आता जनताच सोक्षमोक्ष लावेल”, असं गिरीश महाजन म्हणाले.

संबंधित व्हिडीओ:

हेही वाचा :

उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात बैठक, रायगडच्या वादावर चर्चा, मात्र राज्यात एकत्र लढण्याच्या हालचाली

Sanjay Kakade comment on Pawar Thackeray pattern

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.