सोमय्या मूर्ख, केंद्रातली सत्ता गेल्यावर परदेशात पळून जायची वेळ येईल, शिवसेनेच्या माजी आमदाराचा इशारा

| Updated on: Oct 02, 2021 | 9:19 AM

"पक्षाविषयी, 'मातोश्री'विषयी (Matoshree) काहीही बोलू नको, लायकीत राहा. मुंबईत कुठेही या शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ" असं आव्हान शिवसेनेचे कोल्हापूरचे (Kolhapur) माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी दिलं.

सोमय्या मूर्ख, केंद्रातली सत्ता गेल्यावर परदेशात पळून जायची वेळ येईल, शिवसेनेच्या माजी आमदाराचा इशारा
Rajesh Kshirsagar_Kirit Somaiya
Follow us on

कोल्हापूर : भाजप नेते आणि माजी खासदार किरीटी सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसेनेने (Shiv Sena) हल्लाबोल केला आहे. “पक्षाविषयी, ‘मातोश्री’विषयी (Matoshree) काहीही बोलू नको, लायकीत राहा. मुंबईत कुठेही या शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ” असं आव्हान शिवसेनेचे कोल्हापूरचे (Kolhapur) माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी दिलं. ते कोल्हापुरात बोलत होते.

सोमय्यांकडून ठाकरे कुटुंबीयांवर होत असलेल्या आरोपानंतर राजेश क्षीरसागर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. राजेश क्षीरसागर म्हणाले, “केंद्राचं संरक्षण घेऊन फिरण्यापेक्षा मुंबईत कुठेही या शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ. सोमय्या ही मूर्ख व्यक्ती, त्यांची लायकी त्यांना शिवसेनन दाखवून दिली आहे. केंद्रातली सत्ता गेल्यावर परदेशात पळून जायची वेळ येईल”

किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नेहमीच थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सोमय्यांनी ‘मातोश्री’वर गंभीर आरोप केले होते. त्याची परिणीती म्हणून शिवसेनेने सोमय्यांचं तिकीट कापण्यासाठी भाजपला मजबूर केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा शिवसेना-भाजप वेगळे झाल्यानंतर सोमय्यांनी पुन्हा टार्गेट ‘मातोश्री’ केलं आहे.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप केले आहेत. “मा. उद्धव ठाकरे साहेबांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये 19 बंगल्यांचा घोटाळा केलाय, त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. उद्धव ठाकरेंची दडपशाही सुरु आहे असे आरोप सोमय्यांनी केला होता.

ठाकरे कुटुंबाकडे 19 बंगले आहेत. हे बंगले कुठून आले? उद्धव ठाकरे यांनी पत्नीच्या नावे बंगले घेतले आहेत, असं सोमय्या म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी हिरवा रंग धारण करावा

आम्ही हिंदू म्हणून रोखता? उद्धवजी तुम्ही हिरवा रंग धारण करा, मला विसर्जनापासून, आंबेबाईच्या दर्शनापासून रोखता, उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा चालणार नाही. आम्ही हायकोर्टात जाणार, चुकीच्या आदेश देणाऱ्या मुंबई पोलिसांवर कारवाई व्हावी, मुंबई पोलिस कमिशनरवर कारवाई व्हावी, असं किरीट सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्यांचा कोल्हापूर दौरा

दरम्यान, चार दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर दौरा केला होता. किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे तीन आरोप केले आहेत. या घोटाळ्याची तक्रार देण्यासाठी सोमय्यांनी कोल्हापूर दौरा केला होता. कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती.

VIDEO : राजेश क्षीरसागर यांचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल

संबंधित बातम्या 

आता टार्गेट रश्मी ठाकरे! उद्धव ठाकरेंनी बंगले घेण्यासाठी रश्मी वहिनींचा वापर केला; सोमय्यांचा घणाघात

किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप, हसन मुश्रीफांचा चंद्रकांत दादा आणि समरजीत घाटगेंना इशारा