किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप, हसन मुश्रीफांचा चंद्रकांत दादा आणि समरजीत घाटगेंना इशारा

आता हसन मुश्रीफ यांनीही सोमय्या यांना इशारा दिलाय. त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्यावरही मुश्रीफांनी हल्ला चढवलाय. चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्या सांगण्यावरुनच हे आरोप झाल्याचा दावा मुश्रीफांनी केलाय.

किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप, हसन मुश्रीफांचा चंद्रकांत दादा आणि समरजीत घाटगेंना इशारा
हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री


कोल्हापूर : भाजपचे नेते आणि खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लॉर्ड्रिंगचे गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता हसन मुश्रीफ यांनीही सोमय्या यांना इशारा दिलाय. त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्यावरही मुश्रीफांनी हल्ला चढवलाय. चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्या सांगण्यावरुनच हे आरोप झाल्याचा दावा मुश्रीफांनी केलाय. आपण किरीट सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटीचा दावा दाखल करणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले. दोन आठवड्यात कोल्हापूर कोर्टात दावा दाखल करणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिलीय. (Hasan Mushrif’s warning to Chandrakant Patil and Samarjit Ghatge)

मी अनेक दिवसांपासून मी सांगत होतो की, माझा पक्ष आणि पवार साहेबांवर आरोप झाले, त्याला मी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे आपल्यावर आरोप होणार ही खात्री होती. या आरोपांचा मी निषेध करतो, असं मुश्रीफ म्हणाले. सोमय्या यांच्या CA पदवीवर शंका आहे. यापूर्वी ईडीची धाड पडली. मात्र त्यांना काहीच मिळालं नाही. सोमय्या यांना यातील काही माहिती नाही. त्यांनी कोल्हापुरात येऊन माहिती घ्यायला हवी होती, असंही मुश्रीफ म्हणाले. एवढंच नाही तर चंद्रकांत पाटील यांच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही मुश्रीफ यांनी दिलाय.

‘अमित शाहांच्या मैत्रीमुळं पाटलांना पद, नाहीतर…’

घाटगे यांचे कार्यकर्ते दोन दिवसांपासून याची चर्चा करत होते. म्हणून मी सुद्धा आधीच निरोप दिला होता. शहा यांच्या मैत्रीमुळेच दादांना पद मिळालं आहे. अन्यथा कोल्हापुरात भाजप नावालाही उरला नसता. चंद्रकांत पाटलांना सामाजिक काम करता येत नाही, असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला आहे. कार्यकर्त्यांनी उद्रेक करु नये, बिचाऱ्या सोमस्यांना यातील काही माहिती नाही. ते फक्त पक्षानं दिलेलं काम करतात, असंही मुश्रीफ यांनी म्हटलंय.

मुश्रीफांच्या मुलावर आरोप

बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले.  सीआरएम सिस्टम प्रा. लि (CRM Systems PVT LTD ) ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ (Navid Mushrif) यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे,  2 कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे.

बाप-बेट्यांच्या 127 कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे

बाप बेटे दोघांच्या 127 कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत.  हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. 2018- 19 मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. बेनामी ट्राझॅक्शन 127 कोटींचे व्यवहार समोर आले आहेत.

उद्या मी मुंबई इडीकडे अधिकृत तक्रार करणार आहे. 2700 पानांचे पुरावे देणार आहे. माझ्याकडे 2 मंत्र्यांचे फाईल तयार होते, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन मंत्री होते, त्यापैकी एकाचं प्रकरण आज मी सांगितल्याचं सोमय्या म्हणाले.

इतर बातम्या :

हसन मुश्रीफ कुटुंबांकडून 127 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांकडून कथित ‘डर्टी 11’मध्ये राखीव खेळाडूचं नाव!

किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif’s warning to Chandrakant Patil and Samarjit Ghatge

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI