नवी मुंबईत भाजपला धक्का, राजीनामा दिलेले 4 नगरसेवक शिवसेनेत जाणार

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना चार नगरसेवकांनी राजीनामा दिल्याने भाजपला गळती लागल्याचे चित्र दिसत आहे (BJP corporaters resignation).

नवी मुंबईत भाजपला धक्का, राजीनामा दिलेले 4 नगरसेवक शिवसेनेत जाणार

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील भाजपच्या चार नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या नगरसेवकांमध्ये माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, त्यांची पत्नी नगरसेविका राधा कुलकर्णी, संगीता वास्के आणि मुद्रिका गवळी यांचा समावेश आहे (BJP corporaters resignation). या चारही नगरसेकांनी आपले राजीनामे महापालिका आयुक्त अण्णा मिसाळ यांच्याकडे सुपूर्द केला आहे. चारही नगरसेवक शिवसेनत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना भाजपला गळती लागल्याचे चित्र दिसत आहे.

राजीनामा देणाऱ्या नगरसेवकांची ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट

काही दिवसांपूर्वी तुर्भेमधील भाजपचे चार नगरसेवक शिवसनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली होती. सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्कर, मुद्रिका गवळी या चार भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

सुरेश कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या भव्य हळदीकुंकू समारंभासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सुरेश कुलकर्णी यांचे कौतुक केले होते. तुर्भेतील झोडपट्टीला एस.आर.ए. लागू करण्याबाबत पावले उचलली जातील, असेही आश्वासन शिंदे यांनी दिले होते.

अधिनवेशनाला 24 तासही पूर्ण होत नाही तेवढ्यात धक्का

नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं नुकतच राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं. या अधिनवेशनाला 24 तासही पूर्ण होत नाही तेवढ्यात भाजपच्या चार नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. भाजप नेते गणेश नाईक यांचे अस्तित्व खिळखिळे करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात माहाविकास आघाडीचा नवी मुंबईत मेळावा घेण्यात आला होता (BJP corporaters resignation).

गणेश नाईक यांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता

गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीअगोदर भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत सर्व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, त्यातील काही नगरसेवक पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत. त्यामुळे चार नगरसेवक राजीनामा दिल्यानंतर नाईक गटाला ऐन निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

भाजपचे नगरसेवक संदिप सुतार, सलोजा सुतार, शुभांगी पाटील, शशिकला पाटील, चंद्रकांत पाटील आणि राजू शिंदे या सहा नगरसेवकांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्यासोबत भाजपवासी झालेल्या नगरसेवकांच्या घरवापसीचा फटका गणेश नाईक गटाला बसणार आहे.

Published On - 6:14 pm, Mon, 17 February 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI