VIDEO: फडणवीस बोलत असताना महाजनांची डुलकी, शेलारांनी खुणावताच…?; हा व्हिडीओ पाहाच

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयातील गोळीबार प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरलं. जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार होतोच कसा? असा सवाल करत फडणवीसांनी सरकारला अक्षरश: घेरण्याचा प्रयत्न केला.

VIDEO: फडणवीस बोलत असताना महाजनांची डुलकी, शेलारांनी खुणावताच...?; हा व्हिडीओ पाहाच
फडणवीस बोलत असताना महाजनांची डुलकी, शेलारांनी खुणावताच...?; हा व्हिडीओ पाहाचImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 4:49 PM

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आज विधानसभेत बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयातील गोळीबार प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरलं. जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार होतोच कसा? असा सवाल करत फडणवीसांनी सरकारला अक्षरश: घेरण्याचा प्रयत्न केला. फडणवीस तावातावाने बोलत असतानाच त्यांच्याच पाठी बसलेले भाजपचे नेते गिरीश महाजन (girish mahajan) डुलकी घेत होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या आशिष शेलारांनी (ashish shelar) महाजन यांना हाताच्या कोपऱ्याने खुणावत झोपेतून जागे केले. त्यामुळे महाजन खडबडून जागे झाले आणि त्यांनीही फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळला. महाजन डुलकी घेत असतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महाजन यांची डुलकी, शेलारांचं कोपराने खुणावणं आणि नंतर हाताची अॅक्शन करत गोळीबार झाल्याचं सांगणं… हे सर्व व्हिडीओत दिसत असून त्यावर नेटकरी मजेशीर प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत.

देवेंद्र फडणवीस विधानसभेत बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलत होते. बीडची कायदा आणि सुव्यवस्था किती खराब झाली आहे. याबाबतची सत्तारुढ पक्षाच्या सदस्यांची तळमळ बघावी. बीडमध्ये सत्ता रुढ पक्षाशी संबंधित पदाधिकारी हे तिथे गोळीबार करतात. यात सांगितलं. कौटुंबीक कारणाने. पण कौटुंबीक कारणाने नाही, अध्यक्ष महोदय जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार होतो… असं फडणवीस पोटतिडकीने बोलत होते. दुसरीकडे मात्र, त्यांच्या पाठी बसलेले गिरीश महाजन डुलकी घेत असल्याचं दिसत होतं. महाजन डुलकी घेत असतानाच शेलार यांनी त्यांना कोपराने खुणावलं. तेव्हा महाजन खडबडून जागे होतात आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारू लागतात. त्यानंतर शेलार हाताची अॅक्शन करून गोळीबार असं म्हणताना या व्हिडीओत दिसत आहे.

काय आहे प्रकरण?

आमदार नमिता मुंदडा यांनी आज मुंबईत बोलताना बीडच्या सुरक्षा व्यवस्थेवर ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या, ‘ बीड जिल्ह्यात पोलिसांचा धाक राहिलेला नाही. बीड जिल्ह्यात जे अवैध धंदे सुरु आहेत दारुविक्री, मटका व्यवसाय त्यात पोलिसांचा पूर्णपणे सहभाग आहे. उद्या महिला दिन आहे. एक आठवडा आधी, मी माझ्या घरासमोर असलेल्या रसवंती गृहात माझ्या दोन वर्षांच्या लहान बाळासह रस प्यायला गेले होते. त्याच्या समोर एक ढाबा आहे, तिथे ओपन दारुविक्री सुरु होती. तिथून रस्ता क्रॉस करुन तिघे जण आले आणि त्यांनी माझ्यासोबत फोटो काढायचा आग्रह धरला. तिथे दारुच्या बाटल्या दिसत होत्या. मी माझ्या मुलीसोबत आहे, मला फोटो काढायचा नाही असं सांगितलं. तर त्यांनी ढकलाढकली केली, मोठा गोंधळ घातला.

माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मी पोलिसात तक्रार केली, तर ते एक तासाने आले पण त्यांनी आरोपींना पकडलंही नाही. आम्ही आमच्या गाड्यांमध्ये त्यांना टाकून पोलिस स्टेशनला नेलं. आतापर्यंत एसपींनी मला फोन केला नाही, माझ्या फोनला उत्तर दिलं नाही. डीवायएसपी अंबाजोगाई यांनी लक्ष घातलं नाही. मी महिला आमदार असून सुरक्षित नाही, मग बीडच्या महिला कशा सुरक्षित राहतील, मी लक्षवेधी मांडली तेव्हा पोलिसांवर कारवाई करण्यात आली, अशा अनुभव नमिता मुंदडा यांनी सांगितला.

संबंधित बातम्या:

त्या दिवशी माझ्यासोबत काय घडलं? आमदार नमिता मुंदडांनी सांगितली आपबिती, बीडमध्ये पोलिसांचा धाक नसल्याची टीका!

Chickpea Crop: खरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणी अधिक, उत्पादन वाढले पण विकायचे कुठे?

IPL 2022: वानखेडेसह अन्य स्टेडियम्सवर खेळण्याचा मुंबई इंडियन्सला कितपत फायदा मिळणार? क्रिकेट एक्सपर्ट म्हणतात…

हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.