AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॅनेज झालेला आहे, अदृश्य शक्ती आहे… ‘त्या’ आरोपांवर गिरीश महाजन यांचा हल्लाबोल

अनिल देशमुख यांना बोलण्याचा अधिकार नाही. एका सार्वजनिक कार्यक्रमात अशा पद्धतीने राजकीय बोलणे अपेक्षित नाही असे गिरीश महाजन यांनी देशमुख यांच्यावर टीका करताना म्हटले आहे. मुख्यमंत्री सरकारची भूमिका मांडत आहेत तर अनेकांच्या पोटात दुखत असल्याचेही महाजन यांनी म्हटले आहे.

मॅनेज झालेला आहे, अदृश्य शक्ती आहे... 'त्या' आरोपांवर गिरीश महाजन यांचा हल्लाबोल
girish mahajanImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 07, 2024 | 4:43 PM
Share

मुंबई | 7 फेब्रुवारी 2024 : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हं अखेर अजित पवार यांच्या गटाला दिले आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठ्ठा धक्का असल्याचे मानले जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणूक आयोगाचा निर्णयावर प्रचंड टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर आता भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी हल्लाबोल केला आहे. अजितदादांचे आपण स्वागत करीत आहे. मी आधीपासून सांगत होतो की लोकशाहीत ज्याचे बहुमत त्याचाच पक्ष असतो असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी पक्षा संदर्भात काल निवडणूक आयोगाचा निकाल आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांना बहाल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. यावर निवडणूक आयोग मॅनज झाला आहे. या मागे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. त्याचा समाचार ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे. लोकशाहीत ज्याचे बहुमत त्याचाच पक्ष असतो.  55 आमदारांपैकी शिवसेनेत 10 आमदारही राहीलेले नाहीत. राष्ट्रवादीची देखील तिच परिस्थिती झालेली आहे. त्यांच्याकडे खासदार शिल्लक राहीलेले नाहीत. 80 टक्के आमदार, खासदार जेव्हा एका बाजूला जातात त्यावेळी काहीही पर्याय नसतो. त्यामुळे आयोगाने अतिशय योग्य निर्णय दिला असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

जसे पेरतो तसे उगवते

जसे पेरतो तसे उगवते, मागे पवार साहेबांनी तेच केलं. पवार साहेबांनी पक्ष फोडला नव्हता का ? पवार साहेब बाहेर पडून मुख्यमंत्री झाले नव्हते का ? ही त्यांची परंपरा आहे मग आता का वाईट वाटते ? आपण केलं तर ते चांगलं आणि अजित दादांनी केलं ते वाईट अशी दुहेरी भूमिका चालणार नाही असे गिरीश महाजन यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले आहे.

राज आणि आमच्यात मतमतांतर नाही

भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत विचारता ते म्हणाले की मला याबाबत काही माहीती नाही. राज ठाकरे आणि आमचे काही मतमतांतर नाही…आमचे विचार काही वेगळे नाहीत, काय होईल काय नाही माहीत नाही..पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील असे महाजन यांनी यावेळी सांगितले. संजय राऊत यांचा भोंगा सकाळीच सुरु होतो अशी टीकाही महाजन यांनी केली आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच