Gokul Results | बंटी पाटलांनी विश्वास दाखवला, सर्वसामान्य कार्यकर्ता गोकुळचा संचालक, बयाजी शेळकेंना अश्रू अनावर

भटके-विमुक्त प्रवर्गातून विरोधी गटातील बयाजी शेळके यांनी 346 मतांनी विजय मिळवला. (Gokul Election Result Bayaji Shelke )

Gokul Results | बंटी पाटलांनी विश्वास दाखवला, सर्वसामान्य कार्यकर्ता गोकुळचा संचालक, बयाजी शेळकेंना अश्रू अनावर
सतेज पाटील गटाचे बयाजी शेळके विजयी
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 3:55 PM

कोल्हापूर : वार्षिक 120 कोटींची उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाचा संचालक (Gokul Dudh Sangh Result) म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एक मानाचं पद समजलं जातं. या पदासाठी तितक्याच ताकदवान व्यक्तीची वर्णी लागत असल्याचे आजपर्यंत चित्र आहे. बयाजी शेळके यांच्या रुपाने कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता गोकुळच्या संचालक पदापर्यंत पोहोचला आहे. पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी शेळकेंना तिकीट दिलं होतं. (Gokul Election 2021 Result Kolhapur Dudh Sangh Congress Satej Bunty Patil Candidate Bayaji Shelke wins)

बहुप्रतीक्षित गोकुळ दूधसंघ निवडणुकीची मतमोजणी होत आहे. पश्चिम महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघावर कुणाची सत्ता येणार? हे दिवसअखेर स्पष्ट होईल. विरोधी आघाडीतून काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या पॅनलची घोडदौड सुरु आहे.

शेळकेंना भावना अनावर

भटके-विमुक्त प्रवर्गातून बयाजी शेळके यांनी 346 मतांनी विजय मिळवला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता आज गोकुळच्या संचालक पदापर्यंत पोहोचलाय. पालकमंत्री सतेज पाटील यांनी शेळके यांना उमेदवारी दिली होती. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना शेळके यांना आपल्या भावना अनावर झाल्या.

पाहा व्हिडीओ :

गोकुळ निवडणुकीसाठी रविवारी मतदान

गोकुळसाठी रविवारी चुरशीने 99.78 टक्के इतकं झालं आहे. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik), माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

सतेज पाटील यांच्या राजश्री शाहू शेतकरी आघाडीचे तीन उमेदवार विजयी

सुजीत मिणचेकर – 346 मतांनी विजयी अमर पाटील – 436 मतांनी विजयी बयाजी शेळके – 239 मतांनी विजयी

(Gokul Election Result Bayaji Shelke )

पहिल्याच निवडणुकीत शौमिका महाडिक विजयी

सर्वसाधारण महिलांमध्ये सतेज पाटील गटाच्या अंजना रेडेकर विजयी झाल्या, तर महाडिक गटाकडून भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आणि महिला प्रवर्गात सत्ताधारी गटाच्या उमेदवार शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) 43 मतांनी विजयी झाल्या. महाडिक कुटुंबियातील उमेदवार विजयी झाल्याने जल्लोष केला जात आहे. शौमिका यांना पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली होती. महादेवराव महाडिक आघाडीने खातं उघडल्यानंतर विरोधी गटाकडून फेर मतमोजणीची मागणी केली जात आहे.

संबंधित बातम्या :

Gokul Election Result | महाडिक गटाने खातं उघडलं, सूनबाई शौमिका महाडिक विजयी

Gokul Dudh Sangh Election Result Live | बंटी पाटलांचे तीन शिलेदार विजयी, महाडिक गटाची धाकधूक वाढली

(Gokul Election 2021 Result Kolhapur Dudh Sangh Congress Satej Bunty Patil Candidate Bayaji Shelke wins)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.