AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांनी राष्ट्रवादीचा विश्वास गमावलाय- पडळकर

भाजपचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांसारख्या नेत्यांनी केलाय. त्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवारांनी राष्ट्रवादीचा विश्वास गमावलाय- पडळकर
| Updated on: Dec 18, 2020 | 12:47 PM
Share

मुंबई: भाजपचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांसारख्या नेत्यांनी केलाय. त्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवण्यासाठीच ते अशाप्रकारचे दावे करत सुटल्याची टीका पडळकर यांनी केली आहे. (Gopichand Padalkar criticize Ajit Pawar and Sanjay Raut)

‘अजित पवार टग्याचा आव आणत आहेत’

“अजित पवार हे दिवसाला बदलत राहणारे नेते आहेत. भाजपचं सरकार होतं तेव्हा एखादी जरी नोटीस आली तरी ते टीव्हीसमोर रडत होते. आता मात्र एखादा टग्या असल्याचा आव आणत भाषणं देत सुटले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील अजितदादांची केविलवाणी अवस्था आम्ही पाहिली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न सुरु आहे,” असा खोचक टोला पडळकरांनी लगावला आहे.

‘भाजपचा एकही आमदार फुटणार नाही’

भाजपला सत्ता ही लोककलण्यासाटी हवी असते. तर महाविकास आघाडीतील नेत्यांना सत्ता ही स्वत:च्या कल्याणासाठी हवी असते, अशी टीकाही त्यांनी केलीय. राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतील कोणताही नेता सांगत असला तरी भाजपचा एकही आमदार फुटणार नाही, असा दावा पडळकर यांनी केलाय. त्याचबरोबर तुरुंगातील सतरंजीवर झोपण्यापेक्षा तुम्हाला विश्वासघातानं राजगादी मिळाली आहे. ती गादी सांभाळा आणि लोककल्याणासाठी सत्तेचा वापर करा, असा सल्लाही पडळकरांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलाय.

‘मातोश्रीचं खातात, गोविंदबागेचं गातात’

गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही पडळकरांनी चांगलाच समाचार घेतला. पडळकर यांनी एक पत्रच संजय राऊतांना पाठवलं आहे. “खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकूचंद असा केला. त्या पद्धतीनं आपला उल्लेख मलाही करता आला असता. पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे. प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला आहे”, अशा शब्दात पडळकर यांनी राऊतांना खडे बोल सुनावले.

संजय राऊत हे ‘मातोश्री’चं खातात आणि ‘गोविंदबागे’चं गातात अशा शब्दात पडळकरांनी राऊतांवर निशाणा साधलाय. शरद पवार यांच्याविषयी आपण काही विधानं केली. त्यावेळी राऊतांचा चांगलाच जळफळाट झाला होता. ते साहजिकच आहे, कारण आपली निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहे, असा घणाघाती टीका पडळकरांनी केलीय.

संबंधित बातम्या:

महाविकास आघाडी सरकार धनगरांचा तिरस्कार करतंय, पडळकरांचा गंभीर आरोप

‘शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा’, पडळकरांचं राऊतांना पत्र

Gopichand Padalkar criticize Ajit Pawar and Sanjay Raut

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.