AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gram Panchayat Election : राज्यातला पहिला निकाल हाती, कोल्हापुरात भाजपाचा गुलाल, काय अपडेट्स ?

कागल तालुक्यातील बामणी ग्रामपंचायतीत भाजपला विजय मिळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Gram Panchayat Election : राज्यातला पहिला निकाल हाती, कोल्हापुरात भाजपाचा गुलाल, काय अपडेट्स ?
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Dec 20, 2022 | 12:00 PM
Share

कोल्हापूरः राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat Election) निकाल काय लागणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सर्वच ग्रामपंचायतींमध्ये मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झाली आहे.  आज सकाळीच पहिला निकाल हाती आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत भाजपने (BJP) खातं उघडल्याची बातमी आहे. कागल तालुक्यातील बामणी ग्रामपंचायतीत भाजपला विजय मिळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते हसन मुश्रीफ गटाला येथे धक्का बसला आहे. समरजित घाटगे यांच्या नेतृत्वातील भाजपच्या पॅनलला विजय मिळाला असून पाच ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत.

भाजपने खातं उघडलं…

  • करवीर तालुक्यातील कावणे गावात भाजपाने बाजी मारली आहे.
  • बामणी निढोरी आणि रणदिवेवाडी या कागल तालुक्यातील तीनही गावात भाजपचा झेंडा फडकला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस गटाला धक्का बसला आहे.
  • राज्यातील 7,751  ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यापैकी 590 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली आहे.
  • कोल्हापूरमधील 43, सांगलीत 28, रायगडमध्ये 50, बीडमध्ये 34 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 44 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
  • त्यामुळे 7,731 ग्रामपंचायतींचा निकाल पाहणं बाकी आहे.
  • यापैकी भाजप आणि शिंदे गटाच्या ताब्यात 252 ग्रामपंचायती आहेत.
  • पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तर सकाळी आठ वाजेपासून राज्यातील विविध भागात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

 ठाकरे गटाने खातं उघडलं

कोल्हापूर जिल्ह्यातील व्हनाळी येथे माजी संजय बाबा घाटगे गटाचे दिलीप कडवे सरपंच पदी विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पॅनलचा इथे दणदणीत विजय झाल्याची माहिती हाती आली आहे.

उस्मानाबादेत पहिला निकाल

उस्मानाबाद जिल्ह्यातील कावळेवाडी ग्रामपंचायतीवर आम आदमी पार्टीचे ऍड अजित खोत विजयी झाल्याची माहिती हाती आली आहे.

इचलकरंजीतील अपडेट्स काय?

इचलकरंजीतील शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल हाती आले आहेत. शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट ग्रामपंचायत सरपंच पदाचे उमेदवार  कस्तुरी वसंत कुरुंदवाडे विजयी झाल्या आहेत.. महाविकास आघाडीच्या उमेदवार येथे विजयी झाले आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.