पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर, आदित्य ठाकरेंकडे ‘या’ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या (36 district guardian minister declare)   केल्या आहेत.

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर, आदित्य ठाकरेंकडे 'या' जिल्ह्याचे पालकमंत्रिपद
Follow us
| Updated on: Jan 08, 2020 | 9:33 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच राज्यातील मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर (36 district guardian minister declare) केले. या खातेवाटपानंतर सर्वांचे लक्ष जिल्हानिहाय पालकमंत्री कोण होणार याकडे लागले होते. नुकतंच आज (8 जानेवारी) मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबई उपनगरचे पालकमंत्रिपद मिळालेले (36 district guardian minister declare) आहे.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यासह गडचिरोलीचेही पालकमंत्री पद मिळालेले आहे. तर कोकणातील दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद हे शिवसेनेला मिळालं आहे. यात सिंधुदुर्गाचे पालकमंत्रिपद उदय रविंद्र सामंत यांच्याकडे तर रत्नागिरीचे पालकमंत्रिपद अनिल दत्तात्रय परब यांना देण्यात आले आहे.

विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री पद हे काँग्रेसच्या वाट्याला आलं आहे. यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांना गोंदियाचे पालकमंत्री पद मिळालेले आहे. तर इतर मागासवर्ग सामाजिक मंत्री विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूर, राज्यमंत्री सतेज पाटील यांना भंडारा, उर्जा मंत्री नितीन राऊत यांना नागपूर आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांना वर्ध्याचे पालकमंत्री पद मिळालेले (36 district guardian minister declare) आहे

राज्यातील 36 जिल्ह्याचे पालकमंत्री

1. पुणे- अजित अनंतराव पवार 2. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख 3. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे 4. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे 5. रायगड – आदिती सुनिल तटकरे 6. रत्नागिरी-  अनिल दत्तात्रय परब 7. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत 8. पालघर- दादाजी दगडू भुसे 9. नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ 10. धुळे- अब्दुल नबी सत्तार 11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी 12. जळगाव-  गुलाबराव रघुनाथ पाटील 13. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ 14. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील 15. सांगली- जयंत राजाराम पाटील 16. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील 17. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात 18. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई 19. जालना- राजेश अंकुशराव टोपे 20. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक 21. हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड 22. बीड- धनंजय पंडितराव मुंडे 23. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण 24. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख 25. लातूर- अमित विलासराव देशमुख 26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे) 27. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू 28. वाशिम- शंभुराजे शिवाजीराव देसाई 29. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे 30. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड 31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत 32. वर्धा- सुनिल छत्रपाल केदार 33. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील 34. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख 35. चंद्रपूर-  विजय नामदेवराव वडेट्टीवार 36. गडचिरोली-  एकनाथ संभाजी शिंदे

ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 30 डिसेंबरला झाला होता. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 36 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मंत्रिपदं मिळाली आहेत. आधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोन मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला 16, शिवसेनेला 14 आणि काँग्रेसला 12 अशी मंत्रिपदं आहेत.

यानंतर चार दिवसांनी म्हणजेच 5 जानेवारी रोजी खातेवाटप जाहीर झालं. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांना खातेवापट जाहीर करण्यात आलं. विशेष म्हणजे या खाते वाटपात दहा राज्यमंत्र्यांकडे एकूण 58 खाती देण्यात आली (36 district guardian minister declare) आहेत.

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.