AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Patel : ज्या भाजपवर टीकांची लाखोली वाहिली, त्याच पक्षाचा झेंडा हाती! हार्दिक यांच्या भाजप प्रवेशाची 5 कारणं, वाचा सविस्तर…

हार्दिक पटेल यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करण्याची आणि भाजमध्ये प्रवेश करण्याची कारणं काय आहेत? जाणून घेऊयात...

Hardik Patel : ज्या भाजपवर टीकांची लाखोली वाहिली, त्याच पक्षाचा झेंडा हाती! हार्दिक यांच्या भाजप प्रवेशाची 5 कारणं, वाचा सविस्तर...
| Updated on: Jun 02, 2022 | 5:35 PM
Share

मुंबई : हार्दिक पटेल… गुजरातसह देशभरात मोठा चाहता आणि समर्थक वर्ग असणारा नेता. हार्दिक पटेल (Hardik Patel) म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो, करारी बाणा असणारा आक्रमक भाजपविरोधी आक्रमक चेहरा. पण आता हार्दिक यांची ही ओळख पुसली जाणार आहे. कारण मागची सहा वर्षे ज्या भाजपवर शाब्दिक हल्ला केला, ज्या भाजपच्या (BJP) विचारधारेवर सडकून टीका केली त्याच भाजपपध्ये हार्दिक पटेल यांनी प्रवेश केला आहे. तरूणांचे प्रश्न सोडवता यावेत म्हणून त्यांनी काँग्रेसशी हात मिळवणी केली पण ही साथ फार काळ तग धरू शकले नाहीत. त्यांचं हे वैचारिक दृष्ट्या  360 डिग्री बदलणं अनेकांना धक्का देणारं आहे. हार्दिक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्यामागची पाच मोठी कोणती? जाणून घेऊयात…

1. काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी न मिळणं

हार्दिक पटेल यांनी 18 मेला जेव्हा काँग्रेसला रामराम ठोकला. यावेळी त्यांनी काँग्रेसला सोडण्याची कारणंही स्पष्ट केली. त्यांनी पक्षनेतृत्वावर सडकून टीका केली. आपल्याला काम करण्याची इच्छा आहे. लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी लोकांमध्ये जाणं त्याचे प्रश्न जाणून घेणं अन् त्यांना न्याय देणं हे माझं कर्तव्य आहे. पण एखाद्या नवरदेवाची नसबंदी करण्यात यावी, अशी अवस्था माझी काँग्रेस पक्षात झाली आहेत असं हार्दिक यांनी म्हटलं. थोडक्यात काय तर हवं ते काम करण्याची संधी मिळत नसल्यानं काँग्रेसला राम राम करण्याचा निर्णय हार्दिक यांनी घेतला. शिवाय तशी संधी भाजपमध्ये मिळेल, अशी आशा असल्याने त्यांनी भाजपचं ‘कमळ’ आपल्या ‘हाती’ घेतलंय.

2. भाजपमध्ये ‘हार्दिक’ स्वागत

हार्दिक यांना काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी मिळत नव्हती. तर दुसरीकडे भाजमध्ये त्यांचं स्वागत केलं जातंय. भाजप हे जाणून आहे की हार्दिक यांची ताकद काय आहे. त्यांच्या पाठिशी मोठा तरूणवर्ग आणि पाटीदार समाज यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजप त्यांना संधी देत आहे. त्याचमुळे त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय.

3. अजूनही मोदी शहा यांची हवा, उचित न्याय सन्मान मिळण्याचं आश्वासन

भाजपचं राष्ट्रीय नेतृत्व सध्या गुजरात केंद्रीत आहे, असं म्हणता येईल. कारण पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह गुजरातमधील आहेत. या दोनही नेत्यांची पक्षावर चांगली पकड आहे. हार्दिक यांचं वय 28 वर्षे आहे. त्यांच्या काम करण्याची क्षमता भाजप जाणून आहे. त्यामुळे त्यांना कामाची संधी आणि उचित न्याय सन्मान मिळण्याचं आश्वासन मिळाल्याने त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली.

4. निवडणुकीत तरूणांचा चेहरा म्हणून नेतृत्व

गुजरात विधानसभेसाठी निवडणुका होऊ घातल्या आहेत. 2022 वर्षाच्या शेवटी किंवा 2023 च्या सुरूवातीला ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. अश्यात तरूणांचं नेतृत्व म्हणून हार्दिक यांच्याकडे पाहिलं जातं. त्याच समर्थनाच्या जोरावर गुजराती जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी हार्दिक प्रयत्नशील असतील. लोकभावनेचा आदर करत आपण या निर्णयापर्यंत आल्याचं हार्दिक सांगतात.

5. पक्षाच्या झेंड्यापेक्षा स्वत: च्या नेतृत्वावर जास्त विश्वास

हार्दिक पटेल हे नेतृत्व पाटीदार समाजाच्या आंदोलनातून तयार झालं आहे. त्यामुळे हार्दिक यांना माहिती आहे की, कोणत्याही पक्षाच्या झेंड्यापेक्षा लोक हार्दिक पटेल नावाला अधिक पाठिंबा देतात. त्यांच्या नेतृत्वाला मानणारा एक मोठा वर्ग आहे. लोकांच्या या पाठिंब्यामुळेच हार्दिक हे एवढी मोठी रिस्क घेऊ शकतात. काँग्रेसमधून थेट भाजपचं जाऊन काम करण्याची जिद्द ठेवतात. त्यांना कोणत्याही पक्षाच्या झेंड्यापेक्षा जास्त स्वकर्तृत्वावर विश्वास आहे. त्याचमुळे त्यांनी काँग्रेसला ‘राम-राम’ करत पंतप्रधान मोदींच्या हातात ‘हात’ दिलाय.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.