Gulabrao Patil : चार मतं घ्यायची लायकी नाही आणि आम्हाला डुक्कर म्हणतात, गुलाबराव पाटलांनी घेतला टिंगल करणाऱ्यांचा खरपूस समाचार

चार लोकांच्या कंडोळ्यानं उद्धव साहेबांना बावळट केलं. चार मतं घ्यायची लायकी नाही यांची आणि आम्हाला डुक्कर बोलतात. हे कोण सहन करणार आहे.

Gulabrao Patil : चार मतं घ्यायची लायकी नाही आणि आम्हाला डुक्कर म्हणतात, गुलाबराव पाटलांनी घेतला टिंगल करणाऱ्यांचा खरपूस समाचार
गुलाबराव पाटलांनी घेतला टिंगल करणाऱ्यांचा खरपूस समाचार Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 2:40 PM

मुंबई – आम्ही बंड केलेलं नाही, आम्ही उठाव केला आहे. हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत घेऊ नये म्हणून आम्ही हा उठाव केला. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सभागृहात बंडेखोर म्हणणाऱ्यांवरती हल्लाबोल केला. तसेच अजित पवारांनाही गुलाबराव पाटील यांचं प्रत्युत्तर दिलं. आम्ही शिवसेना (Shivsena) सोडलेलीच नाही असा अजित पवार (Ajit Pawar) यांना गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला. चहापेक्षा किटली गरम टोला पाटील यांनी आदित्य ठाकरेला यांना लगावला. आज मुख्यमंत्र्याच्या अभिनंदनपर भाषणात त्यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा चांगला समाचार घेतला. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषणात वर्ष-वर्ष जेलमध्ये राहिलोय, तडिपार राहिलेलो आहे, आम्हाला नजरेला नजल द्यायला अजिबात भय नाही. सहजासहजी आम्ही आमदार नाही झालेलो असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

आमच्याबाबत शिवराळ भाषा वापरली गेली

भास्कर जाधव यांनी काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. आम्ही आपसात भिडणार नाही असा टोला देखील गुलाबराव पाटील यांनी लगावला. आम्ही काही लेचे पेचे म्हणून आमदार आलेलो नाही. नगरपंचायत, नगरपालिकेत आम्ही चार नंबरवर गेलो. आम्हाला वाटलं आम्ही रसातळाला जातोय. आमची शिवसेना संपतेय अशी खंत गुलाबराव पाटील यांनी बोलावून दाखवली. एकनाथ शिंदे पाच वेळा गेले, भाजपसोबत जाऊ म्हणून त्यांनी प्रयत्न केले. शंभूराजे देसाई साक्षीदार आहेत. आमच्याबाबत शिवराळ भाषा वापरली गेली असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावरती टीका केली.

हे सुद्धा वाचा

चार लोकांच्या कंडोळ्यानं उद्धव साहेबांना बावळट केलं

चार लोकांच्या कंडोळ्यानं उद्धव साहेबांना बावळट केलं. चार मतं घ्यायची लायकी नाही यांची आणि आम्हाला डुक्कर बोलतात. हे कोण सहन करणार आहे. आम्ही मोठी रिस्क घेऊन बाहेर निघालेलो आहे असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. आजच्या त्यांच्या भाषणात त्यांनी त्यांच्या खास शैलित विरोधकांचा समाचार घेतला.

Non Stop LIVE Update
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.
लय फडफड करत होता, बर्फात जाऊन झोपला की.., जरांगेंचा रोख नेमका कोणावर?
लय फडफड करत होता, बर्फात जाऊन झोपला की.., जरांगेंचा रोख नेमका कोणावर?.
ओमराजे निंबाळकर,अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस; प्रकरण काय?
ओमराजे निंबाळकर,अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस; प्रकरण काय?.