AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gulabrao Patil : चार लोकांच्या कोंडाळ्याने उद्धव साहेबांना बावरट केलं, गुलाबरावांचा हल्लाबोल, आदित्य ठाकरेंवर शायरीतून पलटवार

Gulabrao Patil : विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर ते बोलत होते. आम्ही केवढी मोठी रिस्क घेऊन आम्ही बाहेर निघालो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सारखा विरोधी पक्ष आहे. भाजप सोबत अडीच वर्ष संघर्ष केला.

Gulabrao Patil : चार लोकांच्या कोंडाळ्याने उद्धव साहेबांना बावरट केलं, गुलाबरावांचा हल्लाबोल, आदित्य ठाकरेंवर शायरीतून पलटवार
चार लोकांच्या कोंडाळ्याने उद्धव साहेबांना बावरट केलं, गुलाबरावांचा हल्लाबोल, आदित्य ठाकरेंवर शायरीतून पलटवारImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 04, 2022 | 2:37 PM
Share

मुंबई: तब्बल 14 दिवसानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी अखेर मौन सोडलं. शिवसेनेचे (shivsena) नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केलेल्या टीकेला पाटील यांनी विधानसभेत आपल्या तडफदार भाषणातून प्रत्युत्तर दिलं. कधी आक्रमक होऊ तर कधी शायरीतून गुलाबराव पाटलांनी शिवसेनेवर पलटवार केला. आम्हालाही बाहेर पडल्याचं दु:ख सलतंय. आजबाजूच्या चार कोंडाळ्यांनी आमच्या उद्धव साहेबांना बावरट केलं. जे आमच्या मतांवर निवडून येतात त्यांनी आमची लायकी काढली. आम्हाला डुक्कर म्हटलं. महिलाना वेश्या म्हटलं. ही आमची लायकी. इतकी वर्ष शिवसेनेत काम केलं, त्याची ही बक्षिसी? असा सवाल करतानाच आजूबाजूच्या कोंबड्यांना बाजूला करा, मग बघा. शिवसेना कशी वाढतेय, असं गुलाबराव पाटील म्हणाले. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो. तेव्हा कुणी चिमण्यांनो परत फिरा असं म्हटलं नाही. या बसा. आमच्याशी बोला असं कुणीही म्हटलं नाही, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली.

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर ते बोलत होते. आम्ही केवढी मोठी रिस्क घेऊन आम्ही बाहेर निघालो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सारखा विरोधी पक्ष आहे. भाजप सोबत अडीच वर्ष संघर्ष केला. याची जाणीव आम्हाला आहे. आदित्य ठाकरे किती फिरले पाहा. त्यांचे दौरे काढा. सर्व लिस्टवर आहे. पण एकटे शिंदे साहेब फिरले. शिंदे पाच वेळा आमच्या मतदारसंघात आले. शरद पवार 80 वर्षाचा माणूस जळगावात तीन वेळा आले. टोपे आले, मुंडे आले, अजितदादा आले. जयंत पाटील आले. तुम्ही का नाही आले? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.

मतलब परस्त लोगों की पहचान हो गई

डोळ्याला डोळा भिडवा म्हणता आमचा डोळा मिळाला शिंदे साहेबांशी. आमचा डोळा मिळाल फडणवीस साहेबांशी , आणि लक्षात आलं की, जबसे तुम्हारी निगाहें मेहरबान हो गई, मुश्किल बहोत थी, जिंदगी आसान हो गई, बेहद करीब होने का हमे ये फायदा हो गया की, मतलब परस्त लोगों की पहेचान हो गई, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता पलटवार केला.

बुलंदीओ पर ठहरना कमाल होता है

काही लोक म्हणतात आमच्या नजरेला नजर भिडवली नाहीये. अरे वर्ष वर्ष आम्ही जेलमध्ये राहिलो. 302, 307 भोगलेले लोक आहोत. आम्ही सहज आमदार झालो नाही. भगवा झेंडा हातात घेऊन जय भवानी, जय शिवाजी… करत इथपर्यंत पोहोचलेले लोकं आहोत. आम्ही तडीपार झालेले लोक आहोत. नजर नजर मे रहना भी कमाल होता है, नफस नफस मे भी करना कमाल होता है, बुलंदीओ पर पोहोचना कमाल नही, बुलंदीओ पर ठहरना कमाल होता है, असा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार