Politics : नशिबापेक्षा कष्ट महत्वाचे, घरात बसून काहीच मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांचा आता थेट निशाणा

| Updated on: Sep 18, 2022 | 7:11 PM

शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना कायम गद्दार म्हणून हिणवण्यात आले आहे तर पक्ष प्रमुख हे कुणाला भेटत नाहीत असा ठपका शिंदे गटाकडून ठेवण्यात आला आहे.

Politics : नशिबापेक्षा कष्ट महत्वाचे, घरात बसून काहीच मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांचा आता थेट निशाणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई :  (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर थेट आरोप न करता अप्रत्यक्ष चिमटे काढले होते. पण आता शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील (differences of opinion) मतभेद वाढत असून थेट आरोप-प्रत्यारोपास सुरवात झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुणाला भेटत नाहीत असा ठपका शिंदे गटाने सुरवातीपासूनच ठेवलेला आहे. त्यामुळे घरात बसून काही मिळणार नाही, त्यासाठी कष्ट महत्वाचे असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शिवाय मुख्यमंत्री पद हे सहाजासहजी मिळाले नसून त्यामागचे कष्टही विचारात घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले आहेत. एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर हा निशाणा साधला आहे.

शिवसेनेतून बंड केल्यानंतर पक्षप्रमुख आणि ठाकरे कुटुंबियांवर टोकाची टीका करु नका अशा सूचना एकनाथ शिंदे यांनीच आपल्या आमदारांना दिल्या होत्या. मात्र, दरम्यानच्या काळात या दोन्ही गटामध्ये आरोप-प्रत्यारोप वाढत गेले आणि आता जहरी टीका सुरु झाली आहे.

शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना कायम गद्दार म्हणून हिणवण्यात आले आहे तर पक्ष प्रमुख हे कुणाला भेटत नाहीत असा ठपका शिंदे गटाकडून ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्रीच नाही तर शिंदे गटातील मंत्री आणि आमदारही आता पक्षप्रमुखांवर टीका करु लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तर घरात बसून काहीच मिळत नसल्याचे म्हणत ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

केवळ नशिबालाच दोष देत न बसता कष्टही तेवढेच गरजेचे आहेत. फळाची अपेक्षा न ठेवता अविरत परिश्रम केल्यास फळ हे मिळणारच आहे. असे म्हणत आपण मुख्यमंत्री पदाची आशा न बाळगता केवळ कष्टातून मिळालेले हे फळ असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे घरी बसून काही मिळणार नसल्याचे म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

कुणाला माफी करणे हे दखील एवढे सोपे नाही. क्षमा करुन कोणतीही गोष्ट आत्मसाथ करता येते पण तो गुण नसेल तर काय होऊ शकते हे संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत आहे.क्षमा करण्यासाठी देखील मोठे मन लागतं असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.