उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी; शिवसेना निवडणूक आयोगाकडे पुरावेही सादर करणार?

शिवसेनेच्या वतीने शिंदे गटाविरोधात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर उद्या घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिवसेनेला पुरावे सादर करण्यासाठी दिलेली वेळ देखील उद्या संपणार आहे.

उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी; शिवसेना निवडणूक आयोगाकडे पुरावेही सादर करणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 10:15 AM

मुंबई : शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने शिंदे गटाविरोधात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर उद्या घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेला पुरावे सादर करण्यासाठी दिलेली वेळ देखील उद्या संपणार आहे. त्यामुळे उद्याच शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उठाव केल्यानंतर शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांवर अपत्रतेची कारवाई करण्यात यावी यासोबतच अन्य मागण्यांसंदर्भात शिवसेनेच्या वतीने विविध याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या.  त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने घटनापीठाकडे वर्ग केले आहे. या याचिकांवर आता घटनापीठासमोर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचा नेमका दावा काय?

आमच्याकडे 40 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असून, आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे देखील दाद मागण्यात आली आहे. शिंदे गटाच्या या दाव्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना पुरावे सादर करण्यास सांगितले होते. पुरावे सादर करण्यासाठी शिवसेनेला देण्यात आलेली मुदत उद्या संपणार असल्यानं शिवसेनेच्या वतीने उद्याच निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

उद्या कोणत्या याचिकांवर सुनावणी?

शिवसेनेच्या वतीने शिंदे गटाविरोधात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी. राज्यपालांनी एकनाथ थिंदे यांना दिलेले सत्तास्थापनेचे निमंत्रण, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, शिंदे, फडणवीस सरकारने जिंकलेला विश्वासदर्शक ठराव अशा विविध याचिकांचा यामध्ये समावेश आहे. त्यावर उद्या घटनापीठापुढे सुनावणी होण्याची शक्याता आहे.

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....