राज्याच्या नव्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे बोगस पदवी, आरटीआय कार्यकर्त्याचा दावा

राज्याचे माजी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यानंतर आता उदय सामंत अडचणीत आले (Uday Samant Bogus degree) आहेत.

Uday Samant Bogus degree, राज्याच्या नव्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे बोगस पदवी, आरटीआय कार्यकर्त्याचा दावा

पुणे : महाविकासआघाडीचे खातेवाटप अखेर जाहीर झालं असून यात राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण खातं उदय सामंत यांना देण्यात आलं (Uday Samant Bogus degree) आहे. उदय सामंत यांनी पदभार स्विकारण्यापूर्वी त्यांनी बोगस विद्यापीठातून पदवी घेतली असल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरदास यांनी केला आहे. उदय सामंत यांनी पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठातून डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरींगची पदविका घेतली आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रतिज्ञापत्रात पदवी आणि विद्यापीठाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे राज्याचे माजी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यानंतर आता उदय सामंत अडचणीत आले (Uday Samant Bogus degree) आहेत.

उदय सामंत यांच्या बोगस विद्यापीठाच्या पदवी प्रकरणी कॉप्स म्हणजेच केअर ऑफ पब्लिक सेफ्टीचे उपाध्यक्ष आणि आरटीआय कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरदास यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

Uday Samant Bogus degree, राज्याच्या नव्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे बोगस पदवी, आरटीआय कार्यकर्त्याचा दावा

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बोगस विद्यापीठातून पदवी घेतल्याचा आरोप हरदास यांनी केला आहे. सामंत यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठातून 1995 साली डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. ज्ञानेश्वर विद्यापीठाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांची परवानगी नाही. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने या पदव्या अवैध ठरवल्या आहेत. त्यामुळे या पदव्यांचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख करणं अयोग्य असल्याचं अभिषेक हरदास यांनी म्हटलं (Uday Samant Bogus degree) आहे.

ज्ञानेश्वर विद्यापीठाने 2010 साली गाशा गुंडाळण्यात आला आहे. या विद्यापीठाचे कुलगुरू शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी होते.

विशेष म्हणजे राज्याचे माजी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याच विद्यापीठातून बीई पदवी घेतली होती. त्यामुळे आजी माजी उच्च शिक्षण मंत्री बोगस विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचेही समोर आलं आहे. दोन्ही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांचा हा अनोखा योगायोग यानिमित्ताने समोर आला (Uday Samant Bogus degree) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *