Uday Samant | उदय सामंतांना कोरोना, मी ठणठणीत, पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार

Uday Samant |  उदय सामंतांना कोरोना, मी ठणठणीत, पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार
. राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पक्षप्रमुख असताना जी भूमिका घेतली तीच भूमिका मुख्यमंत्री झाल्यावरही कायम आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Higher Education Minister Uday Samant Corona Positive)

Namrata Patil

|

Sep 29, 2020 | 10:21 AM

मुंबई : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी ठणठणीत असून पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार, अशी माहिती उदय सामंत यांनी ट्वीटद्वारे दिले. (Higher Education Minister Uday Samant Corona Positive)

गेले दहा दिवसमी मी स्वत: विलगीकरणात आहे. त्यामुळे मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले दहा दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन उदय सामंत यांनी केले आहे. तसेच मी ठणठणीत असून पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार, असेही उदय सामंत म्हणाले.

सध्या उदय सामंत यांची प्रकृती ठणठणीत असून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ते त्यांचं कामकाज सुरु ठेवणार आहेत, अशीही माहिती मिळत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याशिवाय राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली होती. (Higher Education Minister Uday Samant Corona Positive)

संबंधित बातम्या :

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना कोरोना, मुख्यमंत्र्यांसह पवारांच्या धमकी प्रकरणाच्या तपासादरम्यान संसर्गाची शक्यता

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें