पोलिसपत्नींना धीर देणाऱ्या बायकोचा अभिमान, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून ‘होम मिनिस्टर’चे कौतुक

गृहमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडत असताना माझ्या 'होम मिनिस्टर'चा मोठा वाटा आहे. त्या घरची जबाबदारी चोख पार पाडत असल्यामुळेच मला राज्यात काम करण्याची मोकळीक मिळते, अशा भावना अनिल देशमुखांनी व्यक्त केल्या

पोलिसपत्नींना धीर देणाऱ्या बायकोचा अभिमान, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून 'होम मिनिस्टर'चे कौतुक
अनिश बेंद्रे

|

Oct 06, 2020 | 12:30 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आपल्या ‘होम मिनिस्टर’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना काळात घराबाहेर असलेल्या पोलिस पतीच्या कुटुंबाला धीर देण्याचं डोंगराएवढं काम करणाऱ्या पत्नीचं त्यांनी कौतुक केलं. (Home Minister Anil Deshmukh praises wife on her birthday)

“राज्याच्या गृहमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडत असताना यात मोठा वाटा आहे माझ्या ‘होम मिनिस्टर’ अर्थात माझ्या सौ.चा. त्या घरची जबाबदारी चोख पार पाडत असल्यामुळेच मला राज्यात काम करण्याची मोकळीक मिळते. या कर्तव्यदक्ष ‘होम मिनिस्टर’ला आज वाढदिवसानिमित्त माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा” असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.

“तसं पाहिलं तर राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर काही दिवसांतच कोरोना महामारीने हातपाय पसरले. पाठोपाठ लॉकडाऊन सुरू झालं आणि त्यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण आला. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून पोलिसांच्या पाठीशी असल्याचा संदेश देण्यासाठी मला राज्यभर दौरे करावे लागले. कित्येक दिवस घरी जाता येत नव्हतं. दुसरीकडे कोरोनाचीही चिंता होती. अशा कठीण काळात सौ.ने घरची आघाडी खंबीरपणे सांभाळली” अशा शब्दात गृहमंत्र्यांनी आपल्या ‘होम मिनिस्टर’चे कौतुक केले.

“यापूर्वीही सौच्या क्षमतेचा अनुभव असल्याने मलाही निर्धास्तपणे काम करता आलं, पोलिसांच्या पाठीशी उभं राहता आलं. माझ्या अनुपस्थितीत कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवणं, त्यांना काय हवं-नको ते पाहणं, घरी सुना-नातवंडांना आधार देणं ही जबाबदारी सोपी नव्हती. पण सौ.ने ती अगदी लीलया पार पाडली” असं अनिल देशमुखांनी म्हटलं आहे.

“आणखी एक गोष्ट मी कधीही विसरु शकत नाही, ती म्हणजे कोरोनाच्या काळात गृहमंत्री म्हणून पोलिसांच्या पाठीशी मी, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री व माझे इतर सर्व सहकारी ठाम उभे होतो. या काळात पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या पत्नीला चोवीस तास घराबाहेर असलेल्या आपल्या पतीची काळजी होती. अशा काळात त्यांच्याशी बोलून त्यांना धीर देण्याचं म्हटलं तर डोंगराएवढं काम माझ्या सौ. ने केलं. हे वाढदिवसाच्या निमित्त आज सांगताना मला मनोमन अभिमान वाटतो. माझ्या ‘होम मिनिस्टर’ला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. जनसेवेसाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना” अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत. (Home Minister Anil Deshmukh praises wife on her birthday)

संबंधित बातम्या :

‘मातोश्री’च्या सूनबाई ते मिसेस मुख्यमंत्री, रश्मी ठाकरेंचा प्रवास

योगी आदित्यनाथ दुसऱ्यांना मार्गदर्शन करतात, त्यांनी पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं : अनिल देशमुख

(Home Minister Anil Deshmukh praises wife on her birthday)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें